कोकणात जाताय? परशुराम घाट बंद; पर्यायी मार्गावर फक्त ‘या’ वाहनांनाच प्रवेश मिळणार!

158

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. परशुराम घाटात दरळ कोसळल्यामुळे येथून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. या घाटातील वाहतूक वाहतूक शनिवार ९ जुलैपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. या घाटातून जाणारे पर्यायी मार्ग सुद्धा शनिवारी बंद असणार आहेत. पर्यायी मार्ग म्हणजेच लोटे-चिरणी-आंबडस या मार्गे सुद्धा केवळ हलक्या वाहनांची वाहतूक सुरू असणार आहे.

( हेही वाचा : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा! आता स्वस्तात बांधता येणार घर; गृहकर्जावरील व्याजदर झाले कमी)

परशुराम घाट बंद 

एसटी तसेच खासगी बसेसला सुद्धा या पर्यायी मार्गावरून प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्यामुळे ९ जुलैपर्यंत चिपळूण, दापोली, रत्नागिरीकडे जाणार्या एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ जुलैपर्यंत पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे दरडी कोसळून जीवितहानी होऊ नये, यासाठी ९ जुलैपर्यंत परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात यावा, असा अहवाल राष्ट्रीय महामार्गाच्या पेण आणि रत्नागिरी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्यानुसार ६ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ते ९ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (१० जुलैची मध्यरात्र) परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असल्याचे आदेश चिपळूणचे उपविभागीय दंडाधिकारी प्रवीण पवार यांनी दिले. ९ जुलै रोजी परशुराम घाटाची परिस्थिती पाहून व अतिवृष्टीचा विचार करून कार्यकारी अभियंत्यांचा पुन्हा अभिप्राय घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे कळवण्यात आले आहे. याबंदी कालावधीत केवळ कमी वजनाची वाहतूक चिरणी-आंबडस-चिपळूण या पर्यायी मार्गाने वळविण्यात यावी, असे आदेशात नमूद केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.