Eknath Shinde उद्यान मंदिर, शिवाजी पार्क ते भोईवाडा राम मंदिर शोभयात्रेत सहभाग

स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे राम मंदिराचे स्वप्न आज पूर्ण होत असल्याने या शोभयात्रेची सुरुवात बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला वंदन करून होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाईल.

232
Eknath Shinde उद्यान मंदिर, शिवाजी पार्क ते भोईवाडा राम मंदिर शोभयात्रेत सहभाग
Eknath Shinde उद्यान मंदिर, शिवाजी पार्क ते भोईवाडा राम मंदिर शोभयात्रेत सहभाग

आयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे लोकार्पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाले. त्याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत सोमवारी, २२ जानेवारी सायंकाळी ५ वाजता गणेश उद्यान मंदिर, शिवाजी पार्क ते भोईवाडा राम मंदिर येथे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. (Eknath Shinde)

बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला वंदन

स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे राम मंदिराचे स्वप्न आज पूर्ण होत असल्याने या शोभयात्रेची सुरुवात बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला वंदन करून होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाईल. त्यानंतर सर्वजण मिळून उद्यान गणेशाचे दर्शन घेतील. तसेच स्वर्गीय माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या छत्रपती शिवाजी पार्क येथील पुतळ्याला वंदन करून ही शोभायात्रा पुढे मार्गस्थ होईल. (Eknath Shinde)

(हेही वाचा – Indian Open Badminton 2024 : मलेशिया नंतर घरच्या मैदानातही सात्त्विकसाईराज, चिराग उपविजेतेच)

शोभयात्रेचा मार्ग

यानंतर या मार्गाने रॅली पुढे जाईल:- शोभयात्रेचा मार्ग- गणेश उद्यान मंदिर, शिवाजी पार्क – सेना भवन – टिळक ब्रिज – खोदादाद सर्कलहून उजव्या बाजूला – शारदा टॉकीज – पुढे उजव्या बाजूने नायगाव बी.डी.डी. चाळ – भोईवाडा राम मंदिर- भोईवाडा तेथील राम मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते महाआरती होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. (Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.