आधार कार्ड सामान्य माणसाचा अधिकार, हे वाक्य आपण गेल्या काही वर्षांपासून ऐकत आलो आहोत. आता जवळपास सगळ्याच गोष्टींसाठी आधार कार्ड अनिवार्य असल्याने आधार कार्ड नसणे म्हणजे आपली ओळख नसण्यासारखेच आहे. पण आता माणसासोबतच जनावरांचेही आधार कार्ड काढण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. गायी-म्हशींचेही आधार कार्ड काढण्याची तयारी सुरू झाली असल्याचे मोदी यांनी आंतरराष्ट्रीय डेअरी संमेलनाचे उद्घाटन करताना सांगितले.
पशु आधार योजना
भारतातील दुग्ध क्षेत्राला विज्ञानाशी जोडून त्याचा विस्तार केला जात आहे. भारत दुभत्या जनावरांचा सर्वात मोठा डेटाबेस तयार करत आहे. डेअरी क्षेत्रातील प्रत्येक जनावराला टॅग केले जात आहे. तसेच सर्व दुभत्या जनावरांचे आधार कार्ड तयार करण्यात येणार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. पशु आधार असे या योजनेचे नाव असणार आहे. त्यासाठी भारत सरकारने तयारी देखील सुरू केल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः ‘या’ उमेदवारांना परीक्षेविना मिळणार रेल्वेत नोकरी, पटापट भरा अर्ज)
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार
आधार कार्ड तयार करण्यासाठी बायोमेट्रिक ओळख पटवून देण्यासाठी त्याबाबतची माहिती गोळा करावी लागते. म्हणजेच बोटांचे ठसे,डोळे याबाबतची माहिती गोळा करणे आवश्यक असते. पण गाय,म्हैस यांसारख्या मोठ्या जनावरांचा बायोमेट्रिक डेटा गोळा कसा करणार हा प्रश्न आहे. पण त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापार करण्यात येणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे. जनावरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासोबत दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित बाजारपेठ विस्तारण्यासाठी पशु आधार खूप महत्वपूर्ण ठरणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community