विमान (Airplane) प्रवासात काय घडेल सांगता येत नाही, सध्या विमान प्रवास परवडणारा झाला आहे, त्यामुळे समाजातील सर्वच घटक कधी ना कधी हा प्रवास करत असतात. असाच एक पश्चिम बंगाल येथे राहणारा आणि गुजरातमधील नवसारी येथे काम करणारा एक कामगार विमान प्रवास करत होता तेव्हा त्याने चक्क विमानातच (Airplane) बिडी पेटवली. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर त्या प्रवाशाला अटक करण्यात आहे.
(हेही वाचा Madhya Pradesh मधील ख्रिस्ती शाळेत हिंदू मुलांचे ब्रेनवॉश; बेकायदेशीर वसतिगृहात ४८ मुलांचे धर्मांतर)
गुरूवारी सुरतहून कोलकाता येथे जाणाऱ्या विमानाच्या (Airplane) बाथरूममध्ये हा व्यक्ती धूम्रपान करत होता. आश्चर्याची बाब म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळावर प्रवाशांची कसून तपासणी केली जाते, विमानातील प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकतील अशा वस्तू विमानात घेऊन जाण्यास बंधने असतात. तरीदेखील या कामगाराने विमानात बिड्या आणि आगपेटी घेऊन गेला. विमानात तांत्रिक बिघाड आल्याने उड्डाणाला उशीर झाला होता आणि विमान (Airplane) विमानतळावरच असताना एअर हॉस्टेसला बाथरुममधून धूराचा वास आला. तिने तात्काळ विमानतळावरील वरिष्ठांना याबद्दल कळवले, त्यानंतर विमानात तपासणी करण्यात आली. तपासणी केल्यावर विश्वासच्या बॅगेत बिडी आणि एक कडीपेटी आढळून आली, त्यानंतर त्याला विमानातून बाहेर काढण्यात आले. एअरलाइनने या घटनेची तक्रार डुमस पोलिसांकडे केली त्यानंतर या प्रवाशाला अटक केली.
Join Our WhatsApp Community