माफक दरातील ‘या’ सुविधांमुळे एसटीच्या “जन-शिवनेरी” ला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

191
माफक दरातील 'या' सुविधांमुळे एसटीच्या
माफक दरातील 'या' सुविधांमुळे एसटीच्या "जन-शिवनेरी" ला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद
अत्यंत सुरक्षित, अत्याधुनिक सेवा-सुविधांनी युक्त असलेली वातानुकूलित शिवनेरी बससेवा मुंबईच्या बाहेर “जन-शिवनेरी” या नावाने चालविण्यात येत आहे. प्रायोगिक तत्वावर नाशिक-पुणे (शिवाजीनगर) मार्गावर १० जुलै पासून विनावाहक सुरू करण्यात आलेल्या या “जन-शिवनेरी” बससेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.
वोल्वो आणि स्कॅनिया या कंपनीच्या अत्याधुनिक शिवनेरी बसेस अत्यंत माफक दरामध्ये नाशिक-पुणे (शिवाजीनगर) या मार्गावर “जन-शिवनेरी” या नावाने धावत असून दिवसभरात त्यांच्या १८ फेऱ्या होतात. या बसचे नाशिक-पुणे (शिवाजीनगर) प्रवासाचे भाडे ५०० रुपये असून महिलांना ५० टक्के सवलतीमुळे केवळ २५५ रुपयात या अत्याधुनिक, सुरक्षित व वातानुकूलित बससेवेचा लाभ घेणे शक्य झाले आहे. लवकरच राज्यातील इतर काही मार्गावर “जन-शिवनेरी” ही सर्वसामान्यांसाठी माफक दरातील अत्याधुनिक व वातानुकूलित बससेवा सुरु करण्याचा एसटी महामंडळाचा मानस आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.