Ajantha Company : अजंठा कॅटामरॅन बोटीचा प्रवासी वाहतूक परवाना निलंबित; त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी

50
Ajantha Company : अजंठा कॅटामरॅन बोटीचा प्रवासी वाहतूक परवाना निलंबित; त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी
  • प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळ समुद्रात अजंठा कंपनीच्या (Ajantha Company) कॅटामरॅन प्रवासी बोटीला झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र सागरी मंडळाने त्रिसदस्यीय समिती स्थापन केली असून, ही समिती तीन दिवसांत आपला अहवाल राज्य सरकारला सादर करेल. तसेच, या बोटीचा प्रवासी वाहतूक परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आणि सर्वे प्रमाणपत्र तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. पुढील आदेश येईपर्यंत बोटीला प्रवासी वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

(हेही वाचा – २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी; अजमेर पोलिसांनी Bangladeshi infiltrators मोहम्मद शाहिदला केली अटक)

ही घटना शुक्रवारी (११ एप्रिल २०२५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. अजंठा कंपनीची (Ajantha Company) कॅटामरॅन बोट १३० प्रवाशांना घेऊन गेटवे ऑफ इंडियाहून मांडवा जेट्टीकडे निघाली होती. मांडवा जेट्टीपासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर असताना बोटीत समुद्राचे पाणी शिरले. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बोटीवरील कर्मचारी आणि प्रवाशांनी तातडीने मांडवा जेट्टीशी संपर्क साधून मदत मागितली. जवळच्या बोटींनी त्वरित बचावकार्य करत सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे मांडवा जेट्टीवर पोहोचवले. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही, परंतु प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.

(हेही वाचा – Dead Body : शवागृहातील ७५ बेवारस मृत आत्म्यांना मिळणार मुक्ती; कशी वाचा)

मंत्री नितेश राणे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. “प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळणारा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बोटींची नोंदणी आणि तांत्रिक बाबींसाठी सुस्पष्ट नियमावली तयार करण्याचे निर्देश त्यांनी विभागाला दिले. महाराष्ट्र सागरी मंडळाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये यांनी त्रिसदस्यीय समितीची घोषणा केली. सागरी अभियंता आणि चीफ सर्वेअर प्रकाश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करेल. राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कारवाईला गती देण्याचे आदेश दिले. या घटनेमुळे प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या पुढील पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  (Ajantha Company)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.