Mumbai Airport : मुंबई विमानतळावर 16 तास प्रवाशांचे हाल; कारण काय?

269
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर 16 तास प्रवाशांचे हाल; कारण काय?
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर 16 तास प्रवाशांचे हाल; कारण काय?

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) प्रवाशांची मोठी तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं आहे. प्रवाशांना तब्बल 16 तास विमान उड्डाणाची वाट पाहावी लागली आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. मुंबईतून इस्तांबूलला (Istanbul) जाणारे सकाळी 6.30 वाजताचे विमान 8 तासानंतर थेट रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे, प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा-Accident News : मद्यधुंद चालकाचा कारनामा ; एका महिलेसह म्हशीला चिरडलं, नेमकं काय घडलं ?

प्रवाशांच्या माहितीनुसार, मुंबईहून इस्तंबूलला जाणारं हे विमान शनिवारी (28 डिसेंबर) सकाळी 6.55 ला टेकऑफ करणार होतं. सकाळी 8.20 पर्यंत विमानाचं टेक ऑफ होईल अस आधी सांगण्यात आलं. त्यानंतर साडे नऊ वाजता सर्व प्रवाशांना बोर्ड करण्यात आलं आणि विमानतळावरच बसवून ठेवलं गेलं. तास-दीड तास बसवल्यानंतर पुन्हा त्यांना एग्जिट घ्या असं सांगण्यात आलं. अखेर साडे सोळा तासांनी रात्री 11.00 वाजता विमानाचे उड्डाण होणार असल्याचे एअरलाईन्सकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर सर्व प्रवाशांनी पुन्हा साडेबारा वाजता विमानात बसवण्यात आलं.(Mumbai Airport)

हेही वाचा-Himachal Snowfall: अटल बोगदा प्रवाशांसाठी बंद; ‘या’ 3 राज्यांसाठी अती हिमवृष्टीचा इशारा

दरम्यान, या विमानानं 100 प्रवासी प्रवास करत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. इस्तंबूलमध्ये वातावरण थंड असल्यानं प्रवाशी थंडीचे कपडे घालून विमानात बसले होते पण विमानात बसवल्यानंतर दीड तास विना एसी बसून राहिले. पण आता प्रवाशांना सांगण्यात आलं आहे की, हे विमान रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्सनूसार कळते आहे. आम्हाला खेद आहे की, आमची फ्लाइट 6E17, मूळात मुंबई ते इस्तंबूलला चालवायची होती. मात्र, तांत्रिक समस्यांमुळे विमानसेवेला उशीर झाला. दुर्दैवाने, ही समस्या दुरुस्त करून ती गंतव्यस्थानी पाठवण्याचे आमचे सर्वतोपरी प्रयत्न असूनही, अखेरीस आम्हाला फ्लाइट रद्द करावी लागली, असे एअरलाईन्सने म्हटले आहे.(Mumbai Airport)

हेही वाचा-Online Darshan Booking : पंढरपूरला ऑनलाइन दर्शन बुकिंग 2 जानेवारीपर्यंत बंद राहणार; नेमकं कारण काय ?

कंपनीकडून आमच्या प्रवाशांना मदत व सहाय्य प्रदान करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार, निवास, जेवण आणि संपूर्ण परतावा यासारख्या उपायांची व्यवस्था करू. आमच्याकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आला. मात्र, तांत्रिक अडचण सोडवणे शक्य न झाल्याने विमानसेवा पूर्णपणे पूर्ववत होऊ शकली नाही. दरम्यान, कंपनीकडून पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि आता ते रात्री 11 :00 वाजता मुंबईतून रवाना होईल. आमच्या ग्राहकांना खात्री देऊ इच्छितो की त्यांची सुरक्षितता हे आमच्यासाठी प्राधान्यवत आहे, असं कंपनीने म्हटलं आहे.(Mumbai Airport)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.