राज्यातील तापमानाने सध्या उच्चांक गाठल्यामुळे प्रवासीसुद्धा वातानुकूलित वाहनांकडे वळले आहेत. राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीकडे सध्या शिवशाही (एसी गाड्या) उपलब्ध असल्या तरी शिवशाही बसेसचे तिकीट दर वाढल्यामुळे प्रवाशांनी या बसेसकडे पाठ फिरवली आहे.
( हेही वाचा : या मार्गावरील एसी लोकल बंद होणार? )
प्रवासी नाराज
सध्या अमरावती जिल्ह्यात ३५ शिवशाही बसेस आहेत. याशिवाय स्लिपर कोच गाड्यांचाही समावेश आहे. या गाड्यांना अधिक प्रवासी मिळावे म्हणून नियोजन करण्यात येत आहे. परंतु, प्रवाशांचा कल खासगी वाहनांकडेच वाढलेला दिसत आहे. यामुळे खासगी ट्रॅव्हल्स चालकांना चांगले दिवस येऊन एसटीने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. वाढते तापमान पाहता राज्य परिवहन महामंडळाने लांब पल्ल्यासाठी शिवशाही बसेस चालविण्याचे नियोजन केले आहे. एसटीच्या संपामुळे खासगी ट्रॅव्हल्स मालकांचे अच्छे दिन सुरू झाले आहेत. सर्वच मार्गांवर खासगी ट्रॅव्हल्सला भरगच्च प्रवासी प्रतिसाद मिळत आहे.
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर साध्या बसपेक्षा वातानुकूलित बसने प्रवास करण्यास प्रवासी प्राधान्या देतात. यातच शिवशाहीचे (एसी गाड्या) तिकीट दर वाढल्याने प्रवाशांना नाराजी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community