प्रवाशांची ‘समृद्धी’! महामार्गावर उभारणार भव्य फूडकोर्ट, मिळतील ‘या’ सुविधा

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र सध्या पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्याही सुविधा नाहीत, पण येत्या दोन वर्षांमध्ये फुडकोर्ट, उपाहारगृह, स्वच्छतागृह अशा अनेक सुविधा प्रवाशांना देण्यात येणार आहेत, अशी माहिती रस्ते विकास महामंडळाचे एमडी राधेश्याम मोपलवार यांनी दिली आहे. तसेच या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक-प्रवाशांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामाला सुरूवात केली आहे.

( हेही वाचा : पुणेकरांचा कौल कुणाला? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात)

या असतील सुविधा

  • ७०१ किमीच्या मार्गावर १६ ठिकाणी फूडमॉल, पेट्रोलपंप, वाहनतळ या सुविधा देण्यात येणार आहेत.
  • फूडकोर्ट बांधण्यासाठी दीड ते दोन वर्षे लागू शकतात म्हणूनच तोपर्यंत तात्पुरते रेस्टॉरंट्स उभारण्यात येणार आहेत. शिर्डी ते मुंबई हा दुसरा टप्पा जुलै २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
  • समृद्धी महामार्गावर नांदेड आणि परभणीमध्ये दोन भव्य फूडकोर्ट सुरू करण्यात येणार आहेत. साधारणत: ऑक्टोबर २०२३ पर्यंत याचे काम सुरू होणे अपेक्षित आहेत. यासाठी २ हजार हेक्टर शेत जमीन लागणार आहे. रेस्टॉरंट, टायर रिमोल्डिंग, स्वच्छागृहे या सुविधा देण्यावर भर राहिल असे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
  • सध्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी, नागपूरहून शिर्डीच्या दिशेने ७, तर शिर्डीहून नागपूरच्या दिशेने ६ अशी मिळून एकूण १३ ठिकाणी इंधनाची सोय करण्यात आली आहे. या इंधन स्थानकांवर स्नॅक्स, पिण्याचे पाणी तसेच टायर पंक्चर काढण्यासाठी व टायरमध्ये हवा भरण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here