पासपोर्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी! परीक्षेविना केली जाणार निवड; मिळेल भरगच्च पगार

भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय पासपोर्ट ऑर्गनायझेशनमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख याची संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे.

( हेही वाचा : AC Local : मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास होणार गारेगार! एसी लोकलच्या आणखी १० फेऱ्या वाढणार)

या पदासांठी भरती 

केंद्रीय पासपोर्ट ऑर्गनायझेशनमध्ये ( Central Passport Organization) पासपोर्ट अधिकारी(passport officer) आणि सहायक पासपोर्ट अधिकारी ही पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवार पासपोर्टच्या अधिकृत वेबसाईट भेट देऊ शकतात. या भरती अंतर्गत एकूण २४ पदे भरली जाणार आहेत.

अटी व नियम 

  • पदाचे नाव – पासपोर्ट अधिकारी आणि सहायक पासपोर्ट अधिकारी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ ऑगस्ट
  • पद संख्या – २४ जागा
  • वयोमर्यादा – ५६ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अधिकृत वेबसाईट – www.passportindia.gov.in

पासपोर्ट अधिकारी पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ७८ हजार ८०० रुपये ते २ लाख ९ हजार २०० रुपये पगार दिला जाणार आहे.

संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी…

https://www.passportindia.gov.in/AppOnlineProject/pdf/CIR_0267572_Y.pdf

पदाचे नाव वेतन
पासपोर्ट अधिकारी
रु. 78000 – 209200/-
उप पासपोर्ट अधिकारी
रु. 67700 – 208700/-

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here