सध्या आपल्याला सगळ्याच गोष्टी या झटपट करण्याची एक सवय लागली आहे. मग ते काम असो किंवा जेवण बनवणं अवघ्या काही मिनिटांत ते संपवण्यासाठी आपण आतोनात प्रयत्न करत असतो. आपली हीच गरज लक्षात घेऊन काही कंपन्या देखील आपल्याला झटपट बनवा आणि पटपट खा, असे काही पदार्थ देत असतं.
पण अशीच एक ऑफर एका कंपनीला चांगलीच महागात पडली आहे. मार्केटिंगसाठी ग्राहकांना विविधं आमिषं दाखवणा-या एका कंपनीवर एका महिलेने थेट गुन्हा दाखल केला आहे.
(हेही वाचाः पुण्यातील दुचाकीस्वारांना पोलिसांचा इशारा, ‘हे’ करत असाल तर होणार कारवाई)
ठोकला 40 कोटींचा दावा
अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात राहणा-या अमेंडा रेमिरेज या महिलेने अमेरिकन फूड कंपनी क्राफ्ट हेन्झच्या विरोधात 5 मिलियन डॉलर अर्थात 40 कोटींचा दावा ठोकला आहे. अवघ्या साडे तीन मिनिटांत आपल्या कंपनीचा पास्ता तयार होईल, असा दावा संबंधित कंपनीने दावा केला होता. पण तसे न झाल्याने संतप्त महिलेने थेट न्यायालयात धाव घेतली आहे.
काय आहे तक्रार?
क्राफ्ट हेन्झ कंपनीने वेल्वेटा मायक्रोवेव्हेबल मॅक अँड चीज कप तयार करण्यास केवळ साडेतीन मिनिटे लागतील असे सांगितले होते. पण यापेक्षा जास्त वेळ हा पास्ता तयार करण्यासाठी लागल्याने महिलेने ही तक्रार केली आहे. महिलेने ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2022 या काळात 10.99 डॉलरमध्ये मॅक अँड चीज कप खरेदी केले होते. पण इतर विविध टप्प्यांमुळे हा पास्ता तयार करण्यास जास्त वेळ लागत असल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
(हेही वाचाः आता रेल्वेमध्येही मिळणार मराठमोळी पुरणपोळी, ‘असा’ आहे IRCTC चा नवा मेन्यू)
Join Our WhatsApp Community