Patanjali कंपनीच्या अडचणीत वाढ! सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई

182
Patanjali कंपनीच्या अडचणीत वाढ! सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
Patanjali कंपनीच्या अडचणीत वाढ! सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या पतंजली (Patanjali) कंपनीच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सोन पापडीच्या गुणवत्ता चाचणीत अनुत्तीर्ण झाल्याबद्दल उत्तराखंडच्या पिथौरागढच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तिघांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. (Patanjali)

(हेही वाचा –Monsoon Update: अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी वाढणार! येत्या ४८ तासांत महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस)

१७ ऑक्टोबर २०१९ रोजी, एका अन्न सुरक्षा निरीक्षकाने पिथौरागढमधील बेरीनागच्या मुख्य बाजारपेठेत लीला धर पाठक यांच्या दुकानाला भेट दिली होती. तिथे पतंजली नवरत्न इलायची सोन पापडीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. नमुने गोळा करण्यात आले आणि रामनगर कान्हा जी वितरक तसेच पतंजली आयुर्वेद लिमिटेड (Patanjali Ayurveda Limited) यांना नोटीस बजावण्यात आली. (Patanjali)

(हेही वाचा –अजित पवारांची ‘ती’ ओरड निरर्थक, Sharad pawar यांचा दावा)

यानंतर, रुद्रपूर, उधम सिंह नगर, उत्तराखंड येथील राज्य अन्न व औषध चाचणी प्रयोगशाळेत फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. डिसेंबर २०२० मध्ये, राज्याच्या अन्न सुरक्षा विभागाला प्रयोगशाळेकडून मिठाईची निकृष्ट गुणवत्ता दर्शविणारा अहवाल प्राप्त झाला. यानंतर व्यावसायिक लीला धर पाठक, वितरक अजय जोशी आणि पतंजलीचे सहायक व्यवस्थापक अभिषेक कुमार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. (Patanjali)

(हेही वाचा –Lok Sabha Election 2024 : मुंबईत चोख बंदोबस्तात मतदान, ४० हजार पोलिसांचा फौजफाटा मतदानाच्या दिवशी तैनात)

सुनावणीनंतर न्यायालयाने या तिघांना अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६ च्या कलम ५९ अन्वये अनुक्रमे ५,०००, १०,००० आणि २५,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६ अंतर्गत आपला निर्णय जाहीर केला. न्यायालयात सादर केलेले पुरावे उत्पादनाच्या निकृष्ट दर्जाचे स्पष्टपणे निर्देश करतात, असं अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले. (Patanjali)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.