दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने अवयवदानाच्या माध्यमातून नवे मूत्रपिंड मिळण्यासाठी झटणाऱ्या रुग्णालाच अखेर मृत्यूपश्चात अवयवदान करण्याची वेळ आली. ४० वर्षांच्या या रुग्णाने नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या कठीण काळात आपल्यासारखी वेळ दुस-या कोणावर येऊ नये, यासाठी आपल्या घरातील सदस्याला गमावूनही कुटुंबीयांनी त्याचे मृत्यूपश्चात अवयवदान केले.
( हेही वाचा : एसटीच्या तिकीट मशीनचे तीनतेरा; जुन्या तिकीटांचा करावा लागतोय वापर )
अवयवदानासाठी होकार
हा रुग्ण डायलिसिससाठी विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात येत होता. शनिवारी डायलिसिस उपचारांसाठी रुग्णाला नानावटी रुग्णालयात दाखल केले असता त्याला अस्वस्थता वाटू लागले. डायलिसिसच्यावेळी चक्कर आल्याने त्याला तातडीने रुग्णालयातच उपचारांसाठी दाखल करावे लागले. मात्र उपचारादरम्यान रविवारी रुग्ण ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर पत्नीनी अवयवदानासाठी होकार दिला. मृताकडून यकृत दान केले गेले.