मात्र दोन महिने उलटले तरीही रुग्णांना पाच लाखांचा विमा कवच उपलब्ध झालेला नाही. याबाबत स्पष्टीकरण देताना राज्य आरोग्य हमी सोसायटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनोद बोंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतीत निविदा प्रक्रियेचे काम सुरू आहे. संपूर्ण प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. पाच लाखांच्या नव्या योजनेत आजारांची संख्यादेखील वाढली आहे. योजना तर सर्वांनाच लागू केली आहे. त्यामुळे इन्शुरन्स कंपनीला द्यावा लागणारा प्रीमियमही बदलला आहे. नवीन इन्शुरन्स कंपनी शोधून त्यांना सध्याच्या नवीन योजनेतील लाभार्थींची संख्या आणि कवच याची माहिती देऊन प्रीमियम द्यावा लागेल.
(हेही वाचा-Shravan Special : भगवान शंकराने घेतले ‘हे’ दिव्य अवतार, वाचा अलौकिक महत्त्व)
राज्यातील अधिवास प्रमाणपत्र धारकांना ही योजना लागू होईल. सध्याच्या अस्तित्वात असलेल्या योजनेत राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून प्रीमियम युनायटेड इन्शुरन्स कंपनीला एका कुटुंबा मागे 855 रुपये दिले जातात. वर्षभरासाठी या कंपनीला राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वतीने 1 हजार 770 कोटी रुपये दिले जातात. राज्यभरातील 2 कोटी 22 लाख लाभार्थ्यांना या विमा योजनेचा फायदा झाला आहे.