देशभरातील बांगलादेशी घुसखोरांच्या (Bangladeshi infiltrators) विरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबईतील घुसखोरांच्या विरोधातील मोहीमही तीव्र करण्यात आली आहे. अभिनेते सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्यावरील हल्ल्यातील आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याचे समोर आल्यानंतर तर ही समस्या अधिकच चर्चेत आली आहे. नुकतेच ठाणे येथे एक बांगलादेशी घुसखोर चहा विकतांना दिसून आला. आश्चर्य म्हणजे तो चहाचे पैसे भारतीय रुपयामध्ये नव्हे, तर बांगलादेशी टकामध्ये सांगत होता.
(हेही वाचा – PM Narendra Modi ‘या’ दिवशी महाकुंभमेळ्यामध्ये येऊन अमृतस्नान करणार)
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर (Uday Nirgudkar) यांनी त्यांचा हा अनुभव फेसबूकवर शेअर केला आहे. उदय निरगुडकर यांनी म्हटले आहे की, १६ ऑक्टोबर २०२४ या दिवशी ठाणे स्टेशन रोडवरील मराठी ग्रंथ संग्रहालय इमारतीजवळ घडली. मी माझ्या एका नवीन पुस्तकासाठी ग्रंथालयात पुरस्कार स्वीकारणार होतो. माझा मित्र माझ्यासोबत होता. खरे ठाणेकर असल्याने आम्ही सवयीने ममलेदार मिसळ खायला गेलो. त्यानंतर रस्त्याच्या कडेला चहा प्यायला गेलो. चहा झाल्यावर मी विक्रेत्याला विचारले, “किती?” त्याने उत्तर दिले, “२० टका.” मी पुन्हा विचारले, “किती ?” त्याने पुन्हा तेच उत्तर दिले, “बीस टका.”
माझ्या मित्राने त्याला मोबाईलवरून भारताचा ध्वज दाखवला, पण तो ओळखू शकला नाही. आम्हाला कळले की, तो नक्कीच बांगलादेशी आहे; कारण “टका” बांगलादेशी (Bangladeshi Taka) चलन आहे. त्या वेळी आम्ही ओरडायला सुरुवात केली आणि त्याची ओळख विचारू लागलो. तेव्हा १०-१२ विक्रेते आले आणि तिथे राडा सुरू झाला. आम्हाला कार्यक्रमासाठी उशीर होत होता आणि तेही लवकर घटनास्थळावरून पळून गेले. ही घटना ठाणे स्टेशन रोडवर फक्त ३ महिन्यांपूर्वी घडली आहे. आश्चर्य नाही की, आता ते आपल्या घरात प्रवेश करत आहेत आणि समाजाला गंभीर दुखापत आणि धोका निर्माण करत आहेत.” (Bangladeshi infiltrators)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community