बारीक गोष्‍टींकडे देखील लक्ष द्या; Acidity पासून आराम आणि उत्तम झोप मिळण्‍यासाठी टिप्‍स

150
बारीक गोष्‍टींकडे देखील लक्ष द्या; Acidity पासून आराम आणि उत्तम झोप मिळण्‍यासाठी टिप्‍स

तुम्‍हाला रात्री झोपेच्‍या वेळी अस्‍वस्‍थ वाटते का, ज्‍यामुळे पुरेशी झोप मिळत नाही? तर मग, तुम्‍ही एकटे नाहीत. झोप पूर्ण न होणाऱ्या व्‍यक्‍तींच्‍या आकडेवारीसंदर्भात भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि सर्वेक्षणामधून निदर्शनास येते की, ९३ टक्‍के भारतीयांना झोपेची कमतरता जाणवते. अनेकांसाठी, अॅसिड (Acidity) रिफ्लक्‍समुळे घसा किंवा छातीमध्‍ये जळजळ झाल्‍याने झोपमोड होते. गॅस्‍ट्रोएसोफेजल रिफ्लक्‍स डिसीज (जीईआरडी) किंवा क्रोनिक अॅसिड रिफ्लक्‍सचा जवळपास ८ टक्‍के व ३० टक्‍के भारतीयांवर परिणाम होतो, ज्‍यामुळे झोपमोड होऊ शकते किंवा झोपेचा दर्जा खराब होऊ शकतो.

अॅबॉट इंडियाच्‍या मेडिकल अफेअर्सचे संचालक डॉ. जेजो करणकुमार म्‍हणाले, ”अॅसिडीटीचा व्‍यक्‍तीच्‍या दैनंदिन जीवनासह झोपेच्‍या दर्जावर मोठा परिणाम होऊ शकतो. अपुऱ्या झोपेमुळे अॅसिड रिफ्लक्‍स, तसेच थकवा, चिडचिड आणि अवधान न लागणे असा त्रास होऊ शकतो. अॅबॉटमध्‍ये आमचे सोल्‍यूशन्‍स निर्माण करण्‍यावर आणि व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या अॅसिडीटीवर (Acidity) उत्तमप्रकारे नियंत्रण ठेवण्‍यास मदत करण्‍यासाठी जागरूक करण्‍यावर लक्ष केंद्रित आहे.

(हेही वाचा – Ganeshotsav 2024 : मुंबईतील प्रदीप्त मोदकाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद)

”डॉ. हार्दिक शाह, कन्‍सल्‍टण्‍ट गॅस्‍ट्रोएण्‍टेरोलॉजिस्‍ट, हेपॅटोलॉजिस्‍ट अँड एण्‍डोस्‍कोपिस्‍ट, शाह सुपर स्‍पेशालिटी क्लिनिक, भाटिया हॉस्पिटल, वॉकहार्ट हॉस्पिटल आणि जसलोक हॉस्पिटल, मुंबई म्‍हणाले, ”जीईआरडी ही भारतीयांमधील सामान्‍य समस्‍या आहे. माझ्याकडे दर महिन्‍याला येणाऱ्या अनेक रूग्‍णांमध्‍ये गॅस्ट्रिक अॅसिडीटीसंबंधित लक्षणे दिसून येतात, जसे छातीत जळजळ, ज्‍यामुळे त्‍यांच्‍या झोपेवर परिणाम होतो. या समस्‍यांमध्‍ये वाढ करणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन टाळणे, जीवनशैलीमध्‍ये बदल करणे, तणावाचे व्‍यवस्‍थापन आणि त्‍वरित आराम देणारे उपाय जसे अँटासिड्स किंवा डॉक्‍टरांनी शिफारस केलेली औषधे घेणे यांसारख्‍या सक्रिय उपायांसह या लक्षणांचे त्‍वरित निराकरण करणे महत्त्वाचे आहे.” अँटासिड्स सिरप्‍स व चघळता येणाऱ्या गोळ्यांसह विविध फ्लेवर्स व प्रकारांमध्‍ये उपलब्‍ध आहेत, ज्‍यामुळे कूलिंग प्रभाव मिळतो आणि गॅस्ट्रिक अॅसिडीटीची (Acidity) लक्षणे कमी होतात.

(हेही वाचा – IAF Wing Commander वर बलात्काराचा आरोप; महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद)

अॅसिड रिफ्लक्‍सचा त्रास असताना देखील उत्तम झोप मिळण्‍यासाठी काही टिप्‍स पुढीलप्रमाणे :

1. झोपेची स्थिती सुधारा

छातीत जळजळ होणे कमी करण्‍यासाठी तुमची झोपण्‍याची पद्धत देखील महत्त्वाची आहे. अतिरिक्‍त उशी घेत डोके किंवा शरीराचा वरचा भाग उंचावल्‍याने, तसेच डाव्‍या कुशीवर झोपल्‍याने मदत होऊ शकते. दरम्‍यान, लक्षात ठेवा की पाठीवर झोपल्‍याने अॅसिड (Acidity) रिफ्लक्‍सचा त्रास होऊ शकतो.

2. झोपेचे नियोजन करा

दररोज झोप अपुरी होत असल्‍यास अॅसिडीटी (Acidity) पातळ्यांमध्‍ये वाढ होऊ शकते. , झोपेचे योग्‍य शेड्यूल असणे महत्त्वाचे आहे. दररोज झोपण्‍याची वेळ आणि सकाळी उठण्‍याची वेळ समान असली पाहिजे. यामुळे शरीरातील अवयवांचे कार्य सुरळीत होण्‍यास मदत होते, झोपेचा दर्जा उत्तम होतो. तसेच, आराम करण्‍याचा प्रयत्‍न करा आणि आरामदायी वातावरण तयार करा, वाचन करा किंवा आराम देणाऱ्या तंत्रांचा आनंद घ्‍या (जसे चिंतन), आंघोळ करा, रूममध्‍ये शक्‍यतो अंधार व थंडावा ठेवा.

(हेही वाचा – Hindus In Bangladesh : ‘अजानच्या पाच मिनिटे आधी पूजा आणि स्पीकर बंद करा; बांगलादेशच्या गृहमंत्रालयाचा फतवा)

3. आहार सेवनावर लक्ष ठेवा

झोपण्‍यापूर्वी मसालेदार पदार्थांचे किंवा अतिप्रमाणात आहार सेवन करणे टाळा. झोपण्‍यापूर्वी किमान तीन तास अगोदर रात्रीचे जेवण सेवन करा, ज्‍यामुळे अन्‍नपचन योग्‍यप्रकारे होते आणि अॅसिड रिफ्लक्‍सचा धोका कमी होतो. खरेतर, दिवसभरात वारंवार लहान प्रमाणात आहार सेवन केल्‍यास उत्तम ठरू शकते. चॉकलेट, लिंबूवर्गीय फळे व टोमॅटो यांसारख्‍या अॅसिडीटी वाढवणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन करणे टाळा. तसेच झोपण्‍यापूर्वी मद्यपान व कॅफिनचे सेवन कमी करा.

4. जीवनशैली बदल करा

तणावामुळे अॅसिडीटी (Acidity) वाढू शकते. आरामदायी तंत्रे, नियमित व्‍यायाम आणि मानसिक आरोग्‍य उत्तम राखणाऱ्या क्रियाकलापांसह तणावाचे उत्तमप्रकारे व्‍यवस्थापन करा. नियमित शारीरिक व्‍यायाम उत्तम ठरू शकतो, पण झोपण्‍यापूर्वी अधिक प्रमाणात व्‍यायाम करणे टाळा. झोपण्‍यापूर्वी मनात अधिक विचार करू नका.

(हेही वाचा – Maharashtra TET 2024 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024′ अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर)

5. गरज असल्‍यास डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या

तुम्‍हाला सतत गॅस्ट्रिक अॅसिडीटीचा (Acidity) त्रास होत असेल तर वैयक्तिक मार्गदर्शन आणि उपचार पर्यायांसाठी डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या. ते उपयुक्‍त जीवनशैली बदल किंवा औषधोपचारांची शिफारस करू शकतात, ज्‍यामुळे तुम्‍ही अॅसिडीटीचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासोबत झोपेचा दर्जा सुधारू शकता. या टिप्‍सचे पालन करत आणि अॅसिडीटी वाढवणाऱ्या घटकांवर नियंत्रण ठेवत तुम्‍ही रात्रीच्‍या वेळी आरामदायी, उत्‍साहपूर्ण झोपेचा आनंद घेऊ शकता, ज्‍यामुळे सकाळी उठल्‍यानंतर उत्‍साहवर्धक वाटेल आणि तुम्‍ही दिवसभरातील कामासाठी उत्‍साहाने सुसज्‍ज असाल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.