आधी पैसे द्या, मग वीज घ्या! गुजरातच्या कंपनीचा महावितरणाला झटका

159

राज्यात कोळशाच्या साठ्यात लक्षणीय घट झाल्याने, वीजेचे तीव्र संकट उभे राहिले आहे. यावर भारनियमन हा पर्याय असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यात निर्माण झालेल्या या वीज संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गुजरातच्या सीजीपीएल कंपनीकडून 760 मेगावॅट वीज खरेदी करण्याचा निर्णय घेतला. पण आधी पैसे द्या नंतरच वीज देऊ, असे या कंपनीकडून सांगण्यात आल्याने महावितरणाला झटका बसला आहे.

वीज खरेदीचा निर्णय घेतला जाणार

8 एप्रिलला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारनियमन टाळण्यासाठी वीज खरेदी करण्याचा पर्याय निवडण्यात आला. या निर्णयानंतर लगेचच सीजीपीएलकडून 760 मेगावॅट वीज खरेदी करण्याचा निर्णय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतला होता.

( हेही वाचा: राज ठाकरेंच्या सभेमुळे ठाण्यातील ‘या’ वाहतुकींच्या मार्गात होणार बदल! प्रवास करण्याआधी जाणून घ्या )

महावितरणाला मोठा झटका

पण सीजीपीएल कंपनी जी गुजरातमधील टाटांची कंपनी आहे. या कंपनीकडून असे सांगण्यात आले की, आधी 120 कोटींची जी थकबाकी आहे ती द्या. त्यानंतरच वीज पुरवठा केला जाणार. त्यामुळे आता महावितरणाला मोठा झटका बसला आहे. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार मात्र सोमवारी मध्यरात्रीपासून सीजीपीएलकडून वीजपुरवठा सुरु केला जाणार असल्याचे महावितरणाकडून सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.