Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरु; २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार ?

201
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरु; २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार ?

मुख्यंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले होते. या वर्षीच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हप्ता देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. लाडक्या बहि‍णींना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) 1500 रुपयांप्रमाणे सहावा हप्ता मिळणार आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे. डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे.

(हेही वाचा – Boxing Day Test : ऑस्ट्रेलियातील उर्वरित दोन कसोटींत अश्विनच्या जागी तनुष कोटियन भारतीय संघात दाखल)

जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणेमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम २४ डिसेंबरपासून महिलांच्या खात्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे 25 लाख महिलांचे अर्ज आले होते. त्या अर्जांची छाननी पूर्ण करुन या महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाईल.

 2100 रुपयांसाठी वाट पाहावी लागणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर महायुतीनं मोठी घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात महायुतीकडून लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची मागणी करण्यात आली होती. अर्थसंकल्पात याविषयीचा निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा चालू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल, असे म्हटले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.