Paytm Fastag Recharge : पेटीएम युजर्स १५ मार्चनंतर फास्टॅग रिचार्ज करू शकणार नाहीत; आजच आपलं वॉलेट करा शिफ्ट

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३९ बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) नवीन यादी जाहीर केली आहे, जिथून तुम्ही तुमच्या वाहनासाठी फास्टॅग खरेदी करू शकता. पेटीएम पेमेंट्स बँक (पी. पी. बी. एल.) या सुधारित यादीत समाविष्ट नाही.

249
Paytm Fastag Recharge : पेटीएम युजर्स १५ मार्चनंतर फास्टॅग रिचार्ज करू शकणार नाहीत; आजच आपलं वॉलेट करा शिफ्ट

पेटीएम-फास्टॅग रिचार्ज (Paytm Fastag Recharge) करण्याची अंतिम मुदत शुक्रवार १५ मार्च रोजी संपत आहे. जर तुम्ही देखील पेटीएम वॉलेटशी जोडलेले फास्टॅग वापरत असाल तर १५ मार्चनंतर तुमचा फास्टॅग रिचार्ज किंवा टॉप अप होणार नाही. एनएचएआयने पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांना टोल प्लाझावर कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी १५ मार्च २०२४ पूर्वी दुसऱ्या बँकेच्या फास्टॅगवरून त्यांचा फास्टॅग खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

(हेही वाचा – Pankaja Munde : पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर परळीत फटाके फोडून केला जल्लोष)

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३९ बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) नवीन यादी जाहीर केली आहे, जिथून तुम्ही तुमच्या वाहनासाठी फास्टॅग खरेदी करू शकता. पेटीएम पेमेंट्स बँक (पी. पी. बी. एल.) या सुधारित यादीत समाविष्ट नाही. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पेटीएम फास्टॅग (Paytm Fastag Recharge) वापरकर्ते १५ मार्च २०२४ नंतर शिल्लक रिचार्ज किंवा टॉप-अप करू शकणार नाहीत. तथापि, वापरकर्ते टोल भरण्यासाठी त्यांची विद्यमान शिल्लक वापरू शकतात.

तुम्ही तुमचा फास्टॅग या 39 बँकांमध्ये शिफ्ट करू शकता :

एअरटेल पेमेंट्स बँक, अलाहाबाद बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, अॅक्सिस बँक, बंधन बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सिटी युनियन बँक, कॉसमॉस बँक, डोंबीवली नागरी सहकारी बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, फेडरल बँक, फिनो पेमेंट बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडसइंड बँक, जम्मू आणि काश्मीर बँक, कर्नाटक बँक, करूर वैश्य बँक, कोटक महिंद्रा बँक, लाइव्हक्विक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर नागरी सहकारी बँक, पंजाब महाराष्ट्र बँक, पंजाब नॅशनल बँक, सरस्वती बँक, दक्षिण भारतीय बँक, सिंडिकेट बँक, जलगाव पीपल्स को-ऑप. त्रिशूर जिल्हा सहकारी बँक यूको बँक युनियन बँक ऑफ इंडिया येस बँक (Paytm Fastag Recharge)

(हेही वाचा – Neelam Gorhe : स्त्रियांचा सन्मान म्हणजेच स्त्रीचा अधिकार – नीलम गोऱ्हे)

Paytm FAStag कसे बंद कराल?

– जर तुमच्याकडे पेटीएम फास्टॅग असेल पण तुम्ही पेटीएम ॲप वापरत नसाल तर आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ॲप डाऊनलोड करावे लागेल.
– पेटीएम ॲप डाउनलोड केल्यानंतर, तुमच्या पेटीएम खात्यात लॉग इन करा. तुमच्याकडे आधीपासून अकाऊंट नसल्यास, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून लगेच अकाऊंट तयार करू शकता.
– त्यानंतर तिथे सर्च बॉक्समध्ये फास्टॅग सर्च करा. यानंतर मॅनेज फास्टॅगच्या पर्यायावर क्लिक करा.
– ‘Help & Support’ वर क्लिक करा.
– यामध्ये “Banking Services & Payment” सेक्शनमध्ये जाऊन “FASTag” वर क्लिक करून “Chat with us” ऑप्शन सिलेक्ट करा.
– त्यानंतर ‘FASTag प्रोफाईल अपडेट करण्याशी संबंधित प्रश्न’ या ऑप्शनवर क्लिक करा.
– शेवटी “I Want to Close my FASTag” हा पर्याय निवडा. त्यानंतर स्क्रीनवरील सूचना फॉलो करा. तुमचा FASTag बंद केला जाईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.