Paytm Crisis : पेटीएमचे संस्थापक अध्यक्ष विजय शेखर यांनी अर्थमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा

विजय शेखर काही अधिकाऱ्यांसमवेत रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांशी बोलल्याचंही समजतंय. 

221
Paytm Crisis : पेटीएमचे संस्थापक अध्यक्ष विजय शेखर यांनी अर्थमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा
  • ऋजुता लुकतुके

पेटीएम कंपनीचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण तसंच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची भेट घेतल्याचं बोललं जातंय. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्याने तशी बातमी दिली आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेवर घातलेल्या निर्बंधांवर तोडगा काढण्याचाच त्यांचा प्रयत्न असणार हे उघड आहे. (Paytm Crisis)

रिझर्व्ह बँकेनं गेल्या बुधवारी पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई करताना मार्चपासून बँकेतील विविध प्रकारची खाती तसंच वॉलेटमध्ये कुठल्याही प्रकारच्या ठेवी स्वीकारण्यावर बंदी घातली आहे. या बातमीनंतर वन ९७ कम्युनिकेशन्स या पेटीएमच्या पालक कंपनीचे शेअर दोन्ही शेअर बाजारांत कोसळले आहेत. दुसरीकडे पेटीएम कंपनीने रिझर्व्ह बँक तसंच अर्थमंत्रालयाशी चर्चा करुन त्यांच्या अटींची पूर्तता करण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठीच ही भेट असावी असा अंदाज आहे. (Paytm Crisis)

(हेही वाचा – India Tour of Zimbabwe : जुलै महिन्यात भारतीय संघ झिंबाब्वेत ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार)

समस्येवर तोडगा काढण्याची तयारी – विजय शेखर शर्मा

पेटीएमचा मनी लाँडरिंगमध्येही सहभाग असल्याचा आरोप होतो आहे, जो कंपनीने यापूर्वी फेटाळलाय. आणि कंपनीवरील निर्बंध हटवावेत यासाठी कार्यप्रणालीत बदल करण्याचीही तयारी दाखवली आहे. तसंच २९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या निर्बंधांची मुदत वाढवावी अशी विनंतीही त्यांनी रिझर्व्ह बँकेकडे केली आहे. (Paytm Crisis)

पेटीएम पेमेंट्स बँकेवरील गंभीर आरोप पाहता रिझर्व्ह बँक मार्चमध्ये बँकेचा परवानाही रद्द करू शकते, अशी एक चर्चा सध्या सुरू आहे. या घडामोडी पार्श्वभूमीवर सुरू असताना, विजय शेखर यांनी सोमवारी पेटीएमच्या कर्मचाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीद्वारे संवाद साधला. आणि रिझर्व्ह बँकेला सहकार्य करून या समस्येवर तोडगा काढण्याची तयारी विजय यांनी बोलून दाखवली आहे. तसंच कुठल्याही प्रकारची नोकर कपात होणार नसल्याचंही त्यांनी तूर्तास सांगितलं आहे. (Paytm Crisis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.