Paytm Staff Reduction: आर्थिक अडचणीमुळे पेटीएमने १ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, नेमकं कारण काय ? जाणून घ्या …

244
Paytm Crisis : पेटीएम पेमेंट्स बँकेवरील कारवाईनंतर पेटीएम युपीआयची बाजारातील हिस्सेदारी आली ९ टक्क्यांवर

पेटीएमच्या आर्थिक अडचणी (Paytm Staff Reduction) वाढल्यामुळे २०२२मध्ये पेटीएमकडून कर्मचारी कपात सुरू करण्यात आली होती, मात्र आता या अडचणीत अजून वाढ झाल्याचे दिसत आहे; कारण देशातील सर्वात मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या या कंपनीने तब्बल १ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशनने ही व्यापारी कर्मचारी कपात केली आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्षात पेटीएम कर्माचाऱ्यांच्या खर्चात १० ते १५ टक्क्यांची कपात करणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून पेटीएमने कर्मचारी कपात सुरू केली आहे. येत्या वर्षभरात नवीन टॅलेंटला संधी देण्यात येणार असल्यचे कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – Corona New Variant : JN.1 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आढळत आहेत ‘ही’ लक्षणे, काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर… )

कंपनी तोट्यात गेली?
रिझर्व्ह बँकेने असुरक्षित कर्जांवर नियामक निर्बंध लादल्याचा परिणामही पेटीएमच्या व्यवसायावर झाला. पेटीएमने छोटे तिकीट ग्राहक कर्ज बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कंपनी तोट्यात गेली आणि कर्मचारी कपात करावी लागली. जुलै-सप्टेंबरमध्ये पेटीएमचा निव्वळ तोटा जवळपास निम्म्याने कमी होऊन २९२ कोटी रुपये इतका झाला. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीला ५७१.५ कोटी रुपये इतका तोटा झाला होता.

कंपनीचे शेअर्स घसरले…
पेटीएम कंपनी शेअर बाजारात तग धरण्यासाठी संघर्ष करत आहे. कंपनीचे शेअर्स गेल्या महिनाभरात जवळपास २८ टक्क्यांनी घसरले. गेल्या ६ महिन्यांत शेअर्सची किंमत २३ टक्क्यांनी घसरली आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पेटीएमच्या शेअर्सना २० टक्के लोअर सर्किटचा सामना करावा लागला होता. आता कर्मचारी कपातीच्या बातम्यांमुळे शेअर्सवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.