आंबेडकर मार्गावरील परळ-हिंदमाता दरम्यान पादचारी पूल : विद्यार्थी-पालकांसह चित्रपट रसिकांचा रस्ता ओलांडण्याचा मार्ग सुकर

109

दादर परळमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग ओलांडून जाण्यात पादचाऱ्यांना होणाऱ्या अडचणींचा विचार करता मुंबई महापालिकेने हिंदमाता व परळ टी.टी दरम्यान पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. आंबेडकर मार्गावर प्रीमियम टॉकीज आणि सेंट पॉल शाळा यांना जोडणारे हे पादचारी पूल बांधले जाणार आहे.

( हेही वाचा : शिंदेंच्या मित्राला ‘मित्र’चे उपाध्यक्षपद; मविआकडून आक्षेप, भाजपामधूनही विरोध?)

डॉ.बाबसाहेब आंबेडकर रोडवरील प्रिमियर टॉकीज आणि सेंट पॉल शाळा यांना जोडणारा हिंदमाता आणि परळ टी.टी उडडाणपूलादरम्यान पादचारी पूल बांधण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून स्थानिक रहिवाशी तसेच लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. त्यानुसार महापालिकेच्या पूल विभागाच्यावतीने फेबुवारी २०२२मध्ये या पुलाच्या बांधकामाचा आराखडा तयार केला होता. या पुलाच्या बांधकामाला महापालिका प्रशासकांनी स्वत:च्या अधिकारात मान्यता दिल्यानंतर पूल विभागाने यासाठीच्या निविदा मागवल्या,असल्याची माहिती पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आंबेडकर मार्गावरील हिंदमाता पूल आणि परेल टी.टी उड्डाणपुलादरम्यान असलेल्या सेंट पॉल शाळा आणि प्रमियर टॉकीज असून या दोन्ही बाजुला असलेल्या पदपथांवरून जोडणारे पादचारी पूल असेल. एकूण ३५ मीटर लांबीचे आणि चार मीटर रुंदीचे पादचारी पूल असेल. या पुलाच्या बांधकामासाठी पियुष एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली असून या पुलाच्या बांधकामासाठी विविध करांसह सुमारे सहा कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या पुलाचे बांधकाम पावसाळा वगळून दीड वर्षांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.