लहान मुलांच्या शाळा सुरु करण्यापूर्वी लसीकरण हवंय

राज्यात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला असला तरीही तिस-या लाटेबाबत अद्यापही बोललं जातंय. तिसरी लाट लहान मुलांमध्ये जास्त पसरेल, ही चर्चा दुस-या लाटेदरम्यानच सुरु झाली होती. त्यामुळेच लहान मुलांच्या लसीकरणाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

देशभरात वर्षाच्या सुरुवातीपासून राबवलेली लसीकरण मोहीम आता लहान मुलांसाठीही लवकर सुरु करण्याच्या हालचाली सुरु आहेत. नुकतंच ‘झायकोव्ह- डी’ या लसीला केंद्राच्या ‘ड्रग जनरल ऑफ इंडिया’कडून लहान मुलांच्या लसीकरणासाठी परवानगी मिळालीय. सध्या ही लस प्रौढांसाठी प्राधान्यानं वापरली जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांनी माहिती दिलीय, मात्र लहान मुलांच्या शाळेचे वर्ग पूर्ण भरण्याअगोदर लसीकरण मोहीम प्राधान्यानं पूर्ण करावी, असं मत बालरोगतज्ज्ञांकडून व्यक्त होतंय.

काही दिवसांपूर्वीच बारा वर्षांवरील मुलांना कोविडपासून वाचवण्यासाठी ‘झायडूस काडलिया’ या औषध निर्मिती कंपनीच्या ‘झायकोव्ह-डी’ या लसीला नुकतीच ‘द ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया’नं परवानगी दिलीय. मात्र लहान मुलांना लसीकरणासाठी घाई तर होत नाहीय ना ?  याकरिता आवश्यक चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात का, याबाबत समाधानकारक माहिती सरकारकडून, तज्ज्ञांकडून उपलब्ध व्हावी, अशी मागणी पालकवर्गाकडून होतेय.

(हेही वाचा – भाजपचा मराठी कट्टा मागे, चौपालच सरस!)

राज्यात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला असला तरीही तिस-या लाटेबाबत अद्यापही बोललं जातंय. तिसरी लाट लहान मुलांमध्ये जास्त पसरेल, ही चर्चा दुस-या लाटेदरम्यानच सुरु झाली होती. त्यामुळेच लहान मुलांच्या लसीकरणाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तिस-या लाटीच्या आगमनाची भीतीही वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त झाली होती. मात्र कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात असल्यानं अजूनतरी तिसरी लाट राज्यात येण्याची शक्यता फारच धूसर असल्याची माहिती वैद्यकीय क्षेत्रातून दिली जातेय.

काय म्हणताहेत बालरोगतज्ज्ञ

प्रौढांसाठी तसेच तरुणांसाठी देशभरात सुरु केलेली लसीकरण मोहीम गेल्या आठ महिन्यांत यशस्वीरित्या पूर्ण होतेय. त्यामुळे आता लहान मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरु करणं गरजेचं आहे. लहान मुलांवरील लसीकरणासाठी आवश्यक अभ्यास आणि चाचण्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या आहेत. त्यामुळे मुलांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण आता लवकरात लवकर सुरु व्हावं.
डॉ मुकेश अग्रवाल, माजी विभागप्रमुख, बालरोग विभाग, केईएम रुग्णालय, परळ, मुंबई

लहान मुलांसाठी लसीकरण सुरु करणं गरजेचं आहे. पुढच्या वर्षापासून शाळांचे वर्ग पूर्णपणे भरण्याअगोदर सर्व मुलांचं प्राधान्याक्रमानं लसीकरण व्हायला हवं. लहान मुलांसाठी लसीकरण मोहीम न थांबता सुरु राहायला हवी. ऑनलाईन क्लासेसला मुलंही कंटाळलीत, त्यांच्या शारिरीक जडणघडणीतही व्यत्यय येतोय. ‘भारत बायोटेक’चं ‘कोव्हॅक्सिन’ लहान मुलांकरता उपलब्ध होतंय. लहान मुलांवर या लसीचा कोणताही दुष्परिणाम होत नाहीय, हे आतापर्यंतचं सर्वेक्षण सांगतंय. तर बारा वर्षांवरील मुलांसाठी ‘झायकोव्ह-डी’ लसही मुबलक प्रमाणात उपलब्ध करत लसीकरण मोहीम सुरु व्हावी.
डॉ अनुजा पेठे, बालरोगतज्ज्ञ, नानावटी सुपरस्पेशलिटी रुग्णालय

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here