मुंबईत मागील काही दिवसांपासून हाती घेण्यात आलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी होणाऱ्या गेट वे ऑफ इंडियाजवळील (Gateway Of India) परिसरात स्वच्छता राखण्यासाठी अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी संध्याकाळी हाती घेण्यात आलेल्या या कारवाईत चहा विक्रेते, लिंबू पाणी विक्रेते यासह अन्य खाद्य विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. (Gateway Of India)
गेट वे ऑफ इंडियाच्या (Gateway Of India) परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने याठिकाणी खाद्य विक्रेतेही स्टॉल्स लावत आहेत. परंतु या खाद्य विक्रेत्यांकडून वस्तू घेतल्यानंतर त्याचा कचरा हा कचरा पेटी किंवा पिशव्यांमध्ये न टाकता उघड्यावर टाकला जातो. त्यामुळे महापालिकेच्यावतीने सर्व प्रकारची स्वच्छता राखण्याचा प्रयत्न कसोशीने केला जात असला तरीही याठिकाणी खाद्य विक्रेत्यांमुळे पर्यटक कचरा करत असल्याचे दिसून आल्याने ए विभागाचे सहायक आयुक्त जयदीप मोरे यांनी याठिकाणी एक पथक कार्यरत ठेवून ज्या खाद्य पदार्थ विक्रेत्याकडील खाद्य पदार्थ अथवा पेय घेतल्यानंतर त्याच्या कागदाचे कप किंवा ग्लास किंवा आईस्क्रिमचे आवरण हे मोकळ्या जागेत पर्यटकांकडून फेकली जातात, त्या सर्व विक्रेत्यांना प्रत्येकी २०० रुपये दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. (Gateway Of India)
(हेही वाचा – BMC : मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा शोध आता सॅटेलाईट इमेजेस प्रणालीच्या आधारे)
दुय्यम अभियंता अरुण वैद्य, कनिष्ठ आवेक्षक लहू बनकर, मुकामद आणि दोन कामगारांच्या मदतीने ही दंडात्मक कारवाई केली जात असून गुरुवारी संध्याकाळी सहा ते रात्री नऊच्या वेळेत गर्दीच्या वेळेत चहा विक्रेते, सरबत विक्रेते, आईस्क्रिम विक्रेत तसेच इतर खाद्य पदार्थ विक्रेत्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर या कचरा केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे. कारवाईचा हा पहिला दिवस असला तरी शुक्रवारपासून वरिष्ठ अतिक्रमण निर्मुलन अधिकारी यांचेही पथक कार्यरत करून या खाद्यपदार्थ विक्रेत्यावर कारवाई केली जाईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Gateway Of India)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community