कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या सदस्यांनी वाढीव निवृत्तिवेतन मिळावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी ईपीएफओने (EPFO) एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार उच्च वेतनातून जास्त योगदान देणारे व वाढीव पेन्शनचा पर्याय निवडणारे सदस्य यासाठी पात्र ठरणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आठ आठवड्यांत करण्यात येईल. ईपीएस-95 योजनेतील सदस्य एकूण पगारावर 8.33 टक्के योगदान जमा करु शकतील. यापूर्वी 15 हजार रुपयांची मर्यादा होती.
( हेही वाचा: ठाणेकरांनो ! नव्या वर्षात ‘हा’ मार्ग वाहतुकीसाठी बंद; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर )
वाढीव पेन्शनसाठी ‘हे’ आहेत पात्र कर्मचारी
- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, देण्यात येणा-या वाढीव निवृत्ती वेतनासाठी पुढील निकषात बसणारे कर्मचारी पात्र असतील.
- असे ईपीएस सदस्य ज्यांनी तत्कालीन वेतन मर्यादा 5 हजार व 6 हजार 500 नुसार योगदान दिले आहे.
- ईपीएस -95 चे सदस्य म्हणून ज्यांनी ईपीएसच्या सुधारणापूर्व योजनेत संयुक्त पर्याय निवडला आहे. असे सदस्य ज्यांचा पर्याय ईपीएफओने फेटाळला आहे.
पात्र कर्मचा-यांना अशी मिळणार वाढीव पेन्शन
- वाढीव पेन्शन ईपीएस सदस्यांनी नजीकच्या ईपीएफओ कार्यालयात जाऊन आवश्यक अर्ज योग्य कागदपत्रांसह भरुन द्यायचा आहे.
- आयुक्तांच्या निर्देशानुसार, अर्ज भरुन विनंती करावी, प्रमाणीकरणाच्या अर्जात अस्वीकरणाचा समावेश वरील अधिसूचनेनुसार असेल.