कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन, EPFO कडून मार्गदर्शक सूचना जारी, ‘हे’ आहेत पात्र कर्मचारी

108

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या सदस्यांनी वाढीव निवृत्तिवेतन मिळावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी ईपीएफओने (EPFO) एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार उच्च वेतनातून जास्त योगदान देणारे व वाढीव पेन्शनचा पर्याय निवडणारे सदस्य यासाठी पात्र ठरणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आठ आठवड्यांत करण्यात येईल. ईपीएस-95 योजनेतील सदस्य एकूण पगारावर 8.33 टक्के योगदान जमा करु शकतील. यापूर्वी 15 हजार रुपयांची मर्यादा होती.

( हेही वाचा: ठाणेकरांनो ! नव्या वर्षात ‘हा’ मार्ग वाहतुकीसाठी बंद; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर )

वाढीव पेन्शनसाठी ‘हे’ आहेत पात्र कर्मचारी

  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, देण्यात येणा-या वाढीव निवृत्ती वेतनासाठी पुढील निकषात बसणारे कर्मचारी पात्र असतील.
  • असे ईपीएस सदस्य ज्यांनी तत्कालीन वेतन मर्यादा 5 हजार व 6 हजार 500 नुसार योगदान दिले आहे.
  • ईपीएस -95 चे सदस्य म्हणून ज्यांनी ईपीएसच्या सुधारणापूर्व योजनेत संयुक्त पर्याय निवडला आहे. असे सदस्य ज्यांचा पर्याय ईपीएफओने फेटाळला आहे.

पात्र कर्मचा-यांना अशी मिळणार वाढीव पेन्शन

  • वाढीव पेन्शन ईपीएस सदस्यांनी नजीकच्या ईपीएफओ कार्यालयात जाऊन आवश्यक अर्ज योग्य कागदपत्रांसह भरुन द्यायचा आहे.
  • आयुक्तांच्या निर्देशानुसार, अर्ज भरुन विनंती करावी, प्रमाणीकरणाच्या अर्जात अस्वीकरणाचा समावेश वरील अधिसूचनेनुसार असेल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.