CM Devendra Fadnavis यांना निवृत्तीवेतनधारकांचे पत्र; ‘लाडका बाबा योजना’ सुरु करण्याची मागणी

4035
CM Devendra Fadnavis यांना निवृत्तीवेतनधारकांचे पत्र; 'लाडका बाबा योजना' सुरु करण्याची मागणी
CM Devendra Fadnavis यांना निवृत्तीवेतनधारकांचे पत्र; 'लाडका बाबा योजना' सुरु करण्याची मागणी

राज्यातील निवृत्तीवेतन धारकांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना ‘लाडका बाबा’ (Ladka Baba Yojana) या नात्याने पत्र लिहिले आहे. देशांतील विविध १९६ उद्योग ज्यात एसटी, वीज मंडळ, सहकारी बँका, पतसंस्था, कारखाने, सुत गिरणी, बिडी उद्दोग, एमआयडीसी, कृषी उद्योग विकास महामंडळ, अन्न आणि वस्त्रोद्योग महामंडळ यांसारख्या राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील अनेक उद्योगांत काम करत असलेल्या कामगारांनी त्यांचे निवृत्ती वेतन वाढवण्याची मागणी या पत्राद्वारे केली आहे. EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे प्रांतीय अध्यक्ष एस एन आंबेकर यांनी हे पत्र लिहिले आहे.

(हेही वाचा – Patrakar Sanrakshan Kayda विषयी लवकरच नोटिफिकेशन काढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन)

महागाई वाढली, तरी निवृत्तीवेतनात वाढ नाही

या पत्रात म्हटले आहे की, या क्षेत्रांतील कामगारांनी सेवा काळात पेंशन फंड साठी दरमहा ४१७, ५४१, १२५० रुपयांचे अंशदान जमा केले आहे, त्यामुळे EPS95 स्कीम ही OPS / NPS / UPS पेक्षा भिन्न आहे. EPS 95 पेंशनर्सना मिळत असलेले निवृत्तीवेतन ही अगदी अत्यल्प म्हणजे ३०० रुपयांपासून ते ३५०० रुपयांपर्यंत आहे. याची सरासरी केवळ ११७० रुपये आहे. या EPS95 पेंशन धारकांची संख्या देशांत ७८ लाख आहे. महाराष्ट्रात ही संख्या १४ लाखांपेक्षा अधिक आहे. कितीही महागाई वाढली, तरी यांचे पेंशनमध्ये (pensioners demand) कवडीची ही वाढ होत नाही. त्यामुळे EPS पेंशनर्स दयनीय व मरणासन्न अवस्थेत जीवन जगत आहेत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

काय आहेत मागण्या ?

१. EPS95 पेंशनधारकांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ न्यूनतम निवृत्तीवेतन १००० रुपयांनी वाढवून त्याला ७५०० रुपयांपर्यंत महागाई भत्ता सोबत जोडण्याची शिफारस करून केंद्र सरकार कडून मंजूर करून घ्यावी, तसेच वास्तविक वेतन वर उच्च पेंशन ची मागणी मंजूर करुन घ्यावी.
२. हरियाणा, आंध्र, केरळ ई. राज्य लहान अविकसित असून देखील ते EPS पेंशनधारकांना आर्थिक मदत देत आहे. त्यामानाने महाराष्ट्र हे पूर्ण विकसित राज्य आहे, तरी महाराष्ट्र राज्यातील EPS 95 पेन्शनधारकांसाठी EPS 95 पेंशनर लाडका बाबा हि योजना सुरु करून त्यांचे तुटपुंजे पेन्शन व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारकडून कमीत कमी ५००० रुपयांची महिना आर्थिक मदत मिळावी.
३. केंद्र शासन व राज्य शासनाच्या सर्व सामाजिक सुरक्षा योजना EPS 95 पेन्शनधारकांना मिळाव्यात,

अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे. (CM Devendra Fadnavis)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.