Life Certificate : निवृत्तीवेतन धारकांनी 30 नोव्हेंबरपूर्वी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे

375

निवृत्ती वेतनधारकांची दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी हयात असल्याच्या प्रमाणपत्राची (Life Certificate) यादी संबंधीत बँकेसह पाठविण्यात येणार असून त्यावर आपल्या नावासमोरील रकान्यात निवृत्ती वेतनधारकांनी 30 नोव्हेंबर 2024 पुर्वी स्वत: उपस्थित राहून सदर यादीवर मोबाईल क्रमांक, पॅन क्रमांक, आधार क्रमांक नमुद करून स्वाक्षरी करावयाची आहे. जेणेकरून हयात असल्याचे प्रमाणपत्राची यादी कोषागाराला वेळीच प्राप्त होईल व त्यांचे डिसेंबर 2024 पासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे वेळीच पाठविता येईल.

तसेच जे निवृत्तीवेतनधारक मनिऑर्डरद्वारे निवृत्ती वेतन घेतात, त्यांनी आपले हयात प्रमाणपत्र (Life Certificate) राजपत्रित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत कोषागाराला पाठवावे. खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आपण हयातीचा दाखला सादर करु शकता असे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा इराणमध्ये पुन्हा Hijab बंदी आंदोलन; मुस्लिम विद्यार्थिनीचा अर्धनग्न होऊन विद्यापीठ परिसरात संचार; व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ)

आपले पेन्शन खाते असलेल्या बँकेच्या शाखेत जाऊन बँक अधिकाऱ्याच्या समक्ष हयात दाखल्याच्या यादीतील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करा. बँकेत जाऊ शकत नसल्यास जीवनप्रमाण या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने पुढीलप्रमाणे हयात दाखला सादर करा. 1) https://jeevanpraman.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन करा. 2) GENERAL LIFE CERTIFICATE वर क्लीक करा. 3) तुमचा आधार क्रमांक टाका. 4) तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका आणि तुमचा हयातीचा दाखला काही सेंकदात प्राप्त करा. 5) तुमच्या जवळच्या जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागाराला भेट द्या. 6) हयात दाखल्यावर बँक अधिकारी किंवा राजपत्रीत अधिकाऱ्याच्या समक्ष स्वाक्षरी करुन जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करा. 7) काही कारणानिमित्त परदेशात असल्यास तेथील भारतीय राजदुतामार्फत हयातीचा दाखला संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करा.हयात प्रमाणपत्र 5 डिसेंबर 2024 पर्यंत कोषागारास प्राप्त न झाल्यास त्यांचे डिसेंबर 2024 पासूनचे निवृत्तीवेतन बॅकेकडे पाठविले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी सुहास पवार यांनी कळविले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.