मुंबईत ४ मे रोजी ४५ वर्षांवरील व्यक्तींना केवळ दुसराच डोस मिळणार

कोविन ॲपमध्ये नोंदणी केलेल्या व थेट येणा-या (वॉक इन) नागरिकांनाही यात लस देण्यात येईल.

82

कोविड-१९ लसीकरण मोहिमेंतर्गत मुंबईतील निवडक शासकीय तसेच महापालिका लसीकरण केंद्रांवर मंगळवार, ४ मे २०२१ रोजी ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे लसीकरण होणार आहे. मात्र उपलब्ध मर्यादित लससाठा पाहता, फक्त दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्यांनाच लस देण्यात येणार आहे. कोविन ॲपमध्ये नोंदणी केलेल्या व थेट येणा-या (वॉक इन) नागरिकांनाही यात लस देण्यात येईल. संबंधित केंद्रांची यादी अद्ययावत करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असून, ही यादी महापालिकेच्या समाजमाध्यमांवरुन व प्रसारमाध्यमांतून प्रसारित करण्यात येत आहे.

१८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचा विचार करता, सध्या सुरू असलेल्या व्यवस्थेप्रमाणे, मुंबई महापालिकेच्या निर्देशित ५ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी ५०० नागरिक याप्रमाणे, मंगळवारी सकाळी ९ ते ५ या नियमित वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. हे लसीकरण केवळ ‘कोविन ॲप’मध्ये नोंदणी केलेल्या आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ दिलेली आहे, अशा व्यक्तींसाठी असणार आहे. लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरुप त्या-त्या वेळी योग्य निर्णय घेतला जाईल आणि नागरिकांना अवगत करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

(हेही वाचाः दिलासादायक बातमी : दिवसभरात मुंबईत २,६६२ रुग्ण !)

इथे होणार लसीकरण

  1. बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).
  2. सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)
  3. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).
  4. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).
  5. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.