BMC : पोलिस महासंचालकपदी महिला विराजमान, मुंबई महापालिका आयुक्तपदी कधी?

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली असून शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक ठरल्या आहेत. राज्यातील शिंदे सरकारच्या काळात राज्याच्या पोलिस महासंचालकपदी पहिल्या महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करून नवा इतिहास घडवला असला तरी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासकपदी पहिल्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती कधी होणार असा प्रश्न लोकांना पडला आहे.

964
Maratha Reservation Survey : जात सांगतो पण किती पैसे द्याल?
Maratha Reservation Survey : जात सांगतो पण किती पैसे द्याल?

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली असून शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक ठरल्या आहेत. राज्यातील शिंदे सरकारच्या (Shinde Govt) काळात राज्याच्या पोलिस महासंचालकपदी पहिल्या महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करून नवा इतिहास घडवला असला तरी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासकपदी पहिल्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती कधी होणार असा प्रश्न लोकांना पडला आहे. मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांचा आयुक्तपदाचा तीन वर्षांचा कालावधी मे २०२३मध्ये पूर्ण झाला आहे. ०७ मार्च २०२२ रोजी महापालिका संपुष्टात आल्यानंतर चहल (Iqbal Singh Chahal) यांची महापालिकेच्या प्रशासकपदी नियुक्ती केली. परंतु आता चहल हे आता बदलीसाठी इच्छुक असून त्या जागेसाठी काही सनदी अधिकाऱ्यांच्या नावे चर्चेत आहेत. (BMC)

मात्र, मुंबई महापालिका अस्तित्वात येवून दीडशे वर्षांपेक्षा अधिक काळ उलटलेला असून या महापालिकेचे आयुक्तपद निर्माण होऊन १५८ वर्षे झाली तरी एकाही महिला अधिकाऱ्याची आयुक्तपदी नियुक्ती झालेली नाही. तसेच महापालिकेत मागील ६१ वर्षांपासून सनदी अधिकाऱ्यांची आयुक्तपदी नियुक्ती केली जाते, पण एकाही महिला सनदी अधिकाऱ्याची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे मागील दीडशे वर्षांपासून एकाही महिला अधिकाऱ्याची आयुक्तपदी नेमणूक न झाल्याने राज्यातील शिंदे, फडणवीस आणि पवार सरकार मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी महिला अधिकाऱ्याची नेमणूक करतील का असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे राज्याच्या पोलिस संचालकपदी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची नियुक्ती करून त्यांना पहिल्या महिला पोलिस महासंचालक बनण्याचा बहुमान देणाऱ्या सरकार आता महापालिका आयुक्तपदी महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करून कोणत्या महिला सनदी अधिकाऱ्याला हा बहुमान देण्याचा प्रयत्न करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. (BMC)

(हेही वाचा – Borivali Reservoir : बोरीवली जलाशयाचेही होणार स्ट्रक्चरल ऑडीट; ‘या’ भागाच्या लोकांना बसणार पाण्याची झळ)

भिडे यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती होणे ही काळाची गरज

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगर) आश्विनी भिडे यांचा तीन वर्षांचा कालावधी मे २०२३मध्ये संपुष्टात आला असून सरकारने त्यांच्यावर महापालिका अतिरिक्त आयुक्तांसोबतच मुंबई मेट्रो ३ची अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे आश्विनी भिडे या एमएमआरडीएच्या (MMRDA) आयुक्तपदाच्या प्रबळ दावेदार असताना सरकारने त्यांना मुंबई मेट्रोची अतिरिक्त जबाबदारी सोपवून त्यांना महापालिकेतच कायम ठेवले आहे. सध्या आश्विनी भिडे यांना महापालिकेच्या कामकाजाची पूर्णपणे ज्ञान तसेच अनुभव आहे. परंतु भिडे या शांत, संयमी तसेच नियमानुसारच काम करणाऱ्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या असल्याने सरकारला त्यांना या पदावर नियुक्त करता येईल का हाच मोठा प्रश्न असून सध्याच्या परिस्थितीत महापालिकेला योग्य दिशा देत आर्थिक शिस्तीचीही गरज आहे. त्यामुळे भिडे यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती होणे ही काळाची गरज ठरणार आहे. (BMC)

महापालिका यापूर्वी आर्थिक संकटात असताना अतिरिक्त आयुक्त म्हणून आणि त्यानंतर आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या सुबोधकुमार यांनी महापालिकेला या संकटातून बाहेर काढत आर्थिक परिस्थितीत सुधारणा केली होती. ज्याच्या जोरावर महापालिकेला आज लाखो कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेता येत आहेत. त्यामुळे सध्या सरकारच्या अधिपत्याखाली महापालिका आयुक्त हे प्रशासक म्हणून कामकाज करताना काही प्रकल्प तसेच योजनांना दिशा व गती देण्याची गरज आहे. भिडे यांनी कोस्टल रोड प्रकल्प आकाराला देऊन त्याला गती देत नियोजित वेळेत सुरु करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भिडे यांचे नाव पुढे असले तरी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून यापूर्वी काम केलेल्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर तसेच डॉ. सोनिया सेठी, वल्सा नायर सिंह, आय ए कुंदन यांचीही नावे महिला अधिकारी म्हणून पुढे येवू शकतात, असे बोलले जाते. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.