रस्त्यावर एखादा तरुण माणूस भीक मागायला आला तर आपण त्याला म्हणतो की ’हट्टकट्टा तर आहेस, भीक का मागतोस? काम का नाही करत.’ आपला हा फुकटचा सल्ला ऐकून तो एकतर तोंड पाडतो किंवा आपल्यालाच गुर्मी दाखवतो. मात्र एक आजोबा आजारी असतानाही प्रचंड कष्ट उपसत आहेत.
पंजाबमधील अमृतसर शहरातील एका आजोबांची ही कहाणी आहे. अठ्याहत्तर वर्षांचे हे आजोबा आहेत. यांना मुलंबाळं कोणी नाहीत म्हणून ते आपलं पोट भरण्यासाठी अमृतसर शहरांत लिंबूपाणी विकतात आणि आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यांची ही कहाणी अतिशय भावुक करणारी आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, हे लिंबूपाणी विकणारे आजोबा आपली कहाणी सांगतायत. हा व्हिडीओ हतींदर सिंग नावाच्या माणसाने सर्वांत आधी ट्विटरवर टाकला आहे.
या व्हिडीओत ते आजोबा म्हणत आहेत की, गेल्या पंचवीस वर्षांपासून ते लिंबूपाणी विकण्याचा धंदा करत आहेत. आज त्यांचे वय अठ्याहत्तर वर्षे असूनही या वयातही त्यांना लिंबूपाणी विकावे लागते कारण त्यांना मुलंबाळं नाहीत. म्हणून आपल्या उदरनिर्वाहाची सोय त्यांना स्वतःलाच करावी लागतेय. त्यांचे असे म्हणणे आहे की, जे लोक मेहनत करण्यासाठी सक्षम असतात ते भीक मागून आपलं पोट भरतात. पण मला हे मान्य नाही. मी प्रामाणिकपणे मेहनत करून, दिवसभर उन्हातान्हात उभा राहून लिंबूपाणी विकून माझे पोट भरतोय.
कष्टकरी आजोबांचा हा भावुक व्हिडिओ नक्की पाहा:
Let's Call The Day Praising Babaji From Sri Amritsar Sahib Selling Lemon Soda On Streets,80Years Of Age, His Eyesight Is Poor, Can't Hear Properly, Knees Don't Work,Still Carries Soda Cart For Whole Day Under Scorching Heat
His Smile Is Heartbreaking
Salute To His Hardwork
🙏💔 pic.twitter.com/qK8EVBerHQ— ਹਤਿੰਦਰ ਸਿੰਘ (@Hatindersinghr3) May 6, 2023
त्यांची ही कहाणी ऐकून कित्येक लोक हळवे होत आहेत आणि त्या आजोबांना मदतीचा हात द्यायला पुढे येत आहेत. बऱ्याच जणांनी व्हिडीओ वर ‘आम्ही या आजोबांना कोणत्या प्रकारे मदत करी शकतो?’ असेही प्रश्न विचारले आहेत.
Join Our WhatsApp Community