Ipsos Survey : देशातील जनतेचा सर्वाधिक विश्वास सैन्यावर; विश्वासार्हतेत राजकारण्यांचा क्रमांक शेवटचा

Ipsos Survey देशभरातील महानगरे, टियर १ आणि टियर ३ शहरांतील नागरिकांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. विविध उत्पन्न गट, वयोगट आणि विविध वर्गातील लोकांचा त्यात समावेश होता.

171
Ipsos Survey : देशातील जनतेचा सर्वाधिक विश्वास सैन्यावर; विश्वासार्हतेत राजकारण्यांचा क्रमांक शेवटचा
Ipsos Survey : देशातील जनतेचा सर्वाधिक विश्वास सैन्यावर; विश्वासार्हतेत राजकारण्यांचा क्रमांक शेवटचा

देशातील जनतेचा सर्वाधिक विश्वास कोणावर आहे ? या प्रश्नाचे उत्तर आहे, देशाचे सैन्य, लष्कर, वायुसेना आणि नौदलावर जनतेचा सर्वाधिक विश्वास आहे, तर राजकीय पक्षांवर नागरिक सर्वांत कमी विश्वास ठेवतात. याशिवाय पंतप्रधान, रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि सर्वोच्च न्यायालयावरही देशातील जनता खूप विश्वास ठेवते. ‘इप्सोस’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती प्राप्त झाली आहे, असे वृत्त दैनिक लोकमतने प्रसिद्ध केले आहे. (Ipsos Survey)

देशभरातील महानगरे, टियर १ आणि टियर ३ शहरांतील नागरिकांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. विविध उत्पन्न गट, वयोगट आणि विविध वर्गातील लोकांचा त्यात समावेश होता. (Ipsos Survey)

(हेही वाचा – देशात New Criminal Laws लागू; Bhopal मध्ये रात्री 12.05 वाजता पहिला FIR दाखल)

पंतप्रधानांवरही आहे विश्वास

सर्वेक्षणात सर्वाधिक ५४ टक्के लोकांनी सैन्यावर विश्वास ठेवला आहे. त्याखालोखाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकांनी सर्वाधिक विश्वास ठेवला आहे. गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात विरोधकांनी अनेक प्रकारचे आरोप केले. तरीही जनतेचा पंतप्रधानांवर खूप जास्त विश्वास असल्याचे सर्वेक्षणात आढळले. सर्वसामान्य जनतेमध्ये राजकीय नेते आणि राजकीय पक्षांपेक्षा पोलिसांवर जास्त विश्वास आहे. याशिवाय जनतेने प्रसार माध्यमांवरही विश्वास असल्याचे सांगितले आहे. (Ipsos Survey)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.