शिंदे यांच्या शिवसेनेत न जाणारे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी वळणार भाजपकडे?

175

शिंदे यांच्या शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह देत खरी शिवसेना म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली असली तरी मूळ शिवसेनेतील बहुतांशी पदाधिकारी हे शिंदे यांच्या शिवसेनेत न जाता भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. उध्दव ठाकरे यांच्याकडे आता पक्षच उरला नसल्याने त्यांना आता नवीन पक्ष स्थापन करावा लागणार आहे. त्यामुळे मूळ शिवसेनेतील ज्या पदाधिकाऱ्यांना शिंदे यांच्या शिवसेनेत जायचे नसल्यास त्यांच्यासमोर आता भाजपचा पर्याय असून ज्या भागांमध्ये भाजपचे प्राबल्य आहे, त्या भागांमधील मूळ शिवसेनेतील पदाधिकारी हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

( हेही वाचा : HSC Exam 2023: ऑल दी बेस्ट! मंगळवारपासून बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होणार)

खरी शिवसेना कुणाची याबाबत अखेर केंद्रीय निवडणूक विभागाने निर्णय देत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मान्यता देत त्यांच्या पक्षाला धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याने उध्दव ठाकरे यांचे शिवसेनेतील अस्तित्व संपवण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे यांची खरी शिवसेना असल्याने यापुढे सर्व पदाधिकारी यांना शिंदे निमंत्रित करतील त्याप्रमाणे बैठकांना आणि सभांना उपस्थित राहावे लागणार आहे.

ठाकरे यांचे शिवसेनेतील अस्तित्व संपवून शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिल्याने अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना हा निर्णय रुचलेला नाही. तसेच शिंदे यांच्या शिवसेनेत आधीच प्रवेश केलेल्या काही लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्यातील वैरभावना आदींमुळे ज्यांना उध्दव ठाकरे यांच्यासोबत राहून पुन्हा निवडून येण्याची शक्यता दिसून येत नाही, असे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी हे शिंदे यांच्या शिवसेनेत न राहता ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये उध्दव ठाकरे यांच्यासमवेत असलेले लोकप्रतिनिधी व पदाधिकारी हे शिवसेनेत न राहता भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपले मन तयार करत असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे यांच्या विरोधातील वातावरण भविष्यात आपल्याला मारक ठरेल या भीतीने काही लोकप्रतिनिधी व पदाधिकारी दिर्घकाळाचा विचार करता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेत राहणार नाहीत ते उध्दव ठाकरे यांच्याऐवजी भाजपमध्ये जाणे हे शिवसेनेलाही मान्य असल्याने याला फारसा विरोध होणार नसल्याचेही बोलले जात आहे. जिथे भाजपला भविष्यात आमदार आणि नगरसेवक बदलण्याची शक्यता आहे, तिथे प्रामुख्याने मूळ शिवसेनेतील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी जाणार असल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.