हे लोक फक्त पैसे लुटत आहेत; IAS ची तयारी करत असलेल्या महाराष्ट्रातील तरुणीची आत्महत्या

179
हे लोक फक्त पैसे लुटत आहेत; IAS ची तयारी करत असलेल्या महाराष्ट्रातील तरुणीची आत्महत्या
हे लोक फक्त पैसे लुटत आहेत; IAS ची तयारी करत असलेल्या महाराष्ट्रातील तरुणीची आत्महत्या

दिल्लीतील ओल्ड राजेंद्रनगर येथे आयएएस (IAS) परीक्षेची (UPSC) तयारी करत असलेल्या एका तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवले. अंजली असे या तरुणीचे नाव आहे. ती महाराष्ट्रातील रहिवासी आहे. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी तिने लिहिलेली तीन पानांची सुसाईड नोट समोर आली आहे. त्यामध्ये तिने हॉस्टेल आणि पेईंग गेस्ट वाल्यांकडून होत असलेल्या लुटमारीचा उल्लेख केला आहे.तणावामुळे अंजली हिने जीवन संपवल्याचे संगण्यात येत आहे. अंजलीच्या सुसाईड नोटमधून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या त्रासाचा उल्लेख करण्यात आला आहे. या त्रासामुळे ओल्ड राजेंद्रनगरमध्ये रहात असलेले विद्यार्थी खूप तणावाखाली असल्याचे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे.

(हेही वाचा – “आरोपीला फाशी द्या…” उरण हत्याकांड प्रकरणी Raj Thackeray यांची मुख्यमंत्र्यांकडे भेटीदरम्यान मागणी)

अंजली हिने लिहिले की, ओल्ड राजेंद्रनगरमध्ये हॉस्टेल आणि पीजीचे भाडे अधिक असल्याने खूप अडचणीचा सामना करावा लागतो. हे हॉस्टेल आणि पीजीवाले मिळून विद्यार्थ्यांची लूट करत आहेत, असा आरोप तिने केला.

काय होती अडचण ?

अंजली ज्या खोलीमध्ये राहायची तिचे भाडे १५ हजार रुपये एवढे होते. अंजली हिने ११ जुलै रोजी तिची मैत्रिण श्वेता हिच्यासोबत व्हॉट्सअॅपवरून चॅटिंग करताना खोलीच्या भाड्यामध्ये करण्यात आलेल्या वाढीचा उल्लेख केला होता. श्वेता संध्याकाळी जेव्हा रूमवर आली. तेव्हा अंजली गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये आढळून आली. श्वेताने सांगितले की, २१ जुलै रोजी आम्ही तिला शोधत होतो, मात्र रात्री ८ वाजता जेव्हा तिच्या सोबत राहणारी तरुणी आली आणि तिने खोलीचा दरवाजा उघडला, तेव्हा अंजलीने गळफास घेतल्याचे समोर आले.

अंजलीने पत्रात लिहिले आहे की, “आई-बाबा मला माफ करा. मी आता आयुष्याला कंटाळले आहे. माझ्यासमोर फक्त समस्या आणि समस्याच आहेत. मला आता शांततेची गरज आहे. या नैराश्येतून मुक्त होण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण मी नैराश्येतून मुक्त होऊ शकले नाही. त्यावर मात करू शकले नाही.

पहिल्याच प्रयत्नात युपीएससी (UPSC) परीक्षा पास व्हावी असं माझं स्वप्न होतं. पण मी किती चंचल आहे ते सर्वांना माहितेय. कृपया सरकारी परीक्षांमधील घोटाळे कमी करा आणि रोजगार निर्माण करा. नोकरीसाठी अनेक तरुण धडपडत आहेत. पीजी आणि वसतिगृहाचे भाडेही कमी केले पाहिजे. हे लोक विद्यार्थ्यांकडून फक्त पैसे लुटत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला ते परवडणारे नाही.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.