Bhandara Flood : जनता पुराने त्रस्त; काँग्रेस खासदार रील बनवण्यात व्यस्त

144
Bhandara Flood : जनता पुराने त्रस्त; काँग्रेस खासदार रिल बनवण्यात व्यस्त
Bhandara Flood : जनता पुराने त्रस्त; काँग्रेस खासदार रिल बनवण्यात व्यस्त

गेल्या दोन दिवसांत आलेल्या मुसळधार पावसाने गोंदिया, भंडारा जिल्ह्याला अक्षरशः हादरून टाकले आहे. अनेकांची घरे पडली आहेत. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वत्र पुरामुळे हाहाःकार माजलेला असतांना पाहणी करायला गेलेले काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे (Prashant Padole) यांचा स्टंटबाजी करतांनाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात फिरत आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेस खासदार पडोळे पुराच्या पाण्यात कारच्या बोनेटवर बसून रील बनवताना दिसले. (Bhandara Flood)

(हेही वाचा – Karnataka मधील मंड्या येथे दर्ग्याजवळ गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक)

जनतेवर संकटांचा डोंगर कोसळला असतांना खासदारांचा असा स्टंटबाजी करतांनाचा व्हिडिओ आल्याने टीकेची झोड उठली आहे. अशा दुःखद काळात, जिथे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, घरांची पडझड झाली, अशा स्थितीत पाण्यातून गाडी काढताना रील बनवतानाचा प्रशांत पडोळे यांच्या हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे . शेतकऱ्यांवर एकीकडे दुःखाचे डोंगर कोसळला असतांना जिल्ह्यातील खासदार गाडीचा फवारा उडवत रील कसा काय बनवू शकतो, संवेदना संपल्यात का, असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे. (Bhandara Flood)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.