Per Capita Income : २०३१ पर्यंत भारतीयांचं डरडोई उत्पन्न किती असेल?

Per Capita Income : क्रिसिल या संस्थेनं या विषयीचा महत्त्वाचा अहवाल मार्चमध्ये प्रसिद्ध केला आहे. 

239
Per Capita Income : २०३१ पर्यंत भारतीयांचं डरडोई उत्पन्न किती असेल?
  • ऋजुता लुकतुके

कोव्हिडनंतर भारतीय अर्थव्यवस्थेनं पुन्हा एकदा जोर धरला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात वेगवेगळे अहवाल प्रसिद्ध होतायेत. रेटिंग एजन्सी क्रिसिलने असाच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारत २०३१ पर्यंत उच्च मध्यमवर्गाचा दर्जा असलेला देश असेल असं म्हटलं आहे. तर २०३१ पर्यंत भारताचं दरडोई उत्पन्न ४५०० डॉलर असेल असा अंदाज व्यक्त केलाय. तर २०२५ ते २०३१ पर्यंत, भारताचा सरासरी विकासदर ६.७ टक्के असेल अशी माहिती देखील या अहवालात सांगण्यात आलीय. (Per Capita Income)

२०३१ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि २०३१ पर्यंत उच्च मध्यम-उत्पन्न श्रेणीमध्ये भारत जाईल, असा अंदाज व्यक्त केलाय. भारतीय अर्थव्यवस्था सध्याच्या पातळीपासून दुप्पट होऊन ७ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे जाईल असा अंदाज व्यक्त केलाय. क्रिसिलने इंडिया आउटलुक रिपोर्ट तयार केला आहे. ज्यामध्ये देशांतर्गत संरचनात्मक सुधारणा आणि इतर घटकांसंदर्बात घेतलेले निर्णय यामुळं भारताची आर्थिक प्रगती दिसून येईल, असं या अहवालात सांगण्यात आलंय. (Per Capita Income)

(हेही वाचा – Economic Recession : पुढील वर्षी कुठल्या देशांत येणार मंदी? भारतात मंदी येणार का?)

भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ दरम्यान भारताचा जीडीपी वाढीचा दर ७.६ टक्क्यांपेक्षा चांगला असू शकतो अशी माहिती क्रिसिलच्या अहवालात दिलीय. पुढील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये यामध्ये थोडी घट होण्याची शक्यता असली तरी आर्थिक विकास दर ६.८ टक्के अपेक्षित आहे. क्रिसिलच्या मते, २०२५ ते २०३१ या पुढील सात आर्थिक वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था प्रथम ५ ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य पार करेल आणि नंतर ७ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या जवळ जाईल. सध्या ३.६ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसह भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तर अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी या भारतापेक्षा मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. (Per Capita Income)

२०३१ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. २०३१ पर्यंत दरडोई उत्पन्न उच्च मध्यम-उत्पन्न श्रेणीमध्ये नेईल. २०३१ पर्यंत, भारताचे दरडोई उत्पन्न ४५०० डॉलरपर्यंत पोहोचेल. ज्यामुळं ते उच्च मध्यम-उत्पन्न श्रेणीतील देशात समाविष्ट केले जाईल. जागतिक बँकेच्या मते १००० ते ४००० डॉलर दरडोई उत्पन्न असलेले देश निम्न-मध्यम उत्पन्नाच्या श्रेणीत येतात, तर ४००० ते १२,००० डॉलर्स दरडोई उत्पन्न असलेले देश उच्च-मध्यम उत्पन्नाच्या श्रेणीत येतात. (Per Capita Income)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.