Sangeet Bawankhani : विद्याधर गोखले स्मृतिदिनी होणार संगीत बावनखणी नाटकाचा प्रयोग

26
Sangeet Bawankhani : विद्याधर गोखले स्मृतिदिनी होणार संगीत बावनखणी नाटकाचा प्रयोग
Sangeet Bawankhani : विद्याधर गोखले स्मृतिदिनी होणार संगीत बावनखणी नाटकाचा प्रयोग

सुप्रसिद्ध नाटककार विद्याधर गोखले यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त नाट्यसंगीत पदविका प्राप्त कलाकार , संगीत-नृत्यमय दोन अंकी ‘संगीत बावनखणी’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे. हा नाट्यप्रयोग गुरुवार, २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी उद्यान येथे होणार आहे. (Sangeet Bawankhani)

या नाटकाची रंगावृत्ती आणि दिग्दर्शन श्रीकांत दादरकर यांनी केले आहे. संगीत मार्गदर्शन ज्ञानेश पेंढारकर यांचे असून नृत्य मार्गदर्शन स्मृती तळपदे यांचे आहे.

हा प्रयोग सशुल्क असून नाटकाची तिकिटे प्रयोगापूर्वी दोन तास आधी थिएटरवर उपलब्ध होतील. अधिकाधिक रसिकांनी या कलरफुल नाटकाचा रसास्वाद घ्यावा, असे आवाहन निर्मितीप्रमुख शुभदा दादरकर यांनी केले आहे. (Sangeet Bawankhani)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.