‘हा’ व्याघ्रप्रकल्प ठरला संपूर्ण देशात सर्वोत्तम!

266

आपल्या भारतातील तब्बल ६ व्याघ्र प्रकल्पांना अलिकडेच जागतिक मानकाचा दर्जा मिळाला आणि देशातील व्याघ्रप्रकल्पांना जागतिक पातळीवर एक नवी ओळख मिळाली. देशभरात वाघांची संख्या वाढावी याकरता केंद्र सरकारकडून ‘टायगर प्रोजेक्ट’सारख्या विविध योजना राबवल्या जातात. सध्या भारतात एकूण ५३ व्याघ्र प्रकल्प आहेत. देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आंध्रप्रदेश या राज्यात आहे. याच पार्श्वभूमीवर मॅनेजमेंट इफेक्टीव्हनेस इव्हएल्यूएशनने सर्वेक्षण करून आपला अहवाल सादर केला आहे.

( हेही वाचा : रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! १२ एप्रिलपर्यंत ‘या’ मार्गावरील गाड्या रद्द )

देशात ३५६८ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या आंध्रप्रदेशातील व्याघ्रप्रकल्पाला मागे टाकत मॅनेजमेंट इफेक्टीव्हनेस इव्हएल्यूएशनच्या सर्वेक्षणात केरळमधील पेरियर प्रकल्पाने सर्वोत्तम स्थान पटकावले आहे.

संपूर्ण जगात जवळपास ४,५०० वाघ आहेत. यापैकी सर्वाधिक वाघांचा अधिवास हा भारतात आहे. २०१० च्या अधिकृत जनगणनेनुसार देशातील वाघांची संख्या १७०० च्या घरात होती. यात १२६१ ची वाढ होत २०१८ मध्ये हा आकडा २९०० वर गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ एप्रिलला सांगितले, की २०२२ मध्ये वाघांची संख्या ३१६७ एवढी आहे.

मॅनेजमेंट इफेक्टीव्हनेस इव्हएल्यूएशनचे सर्वेक्षण (एमईई)

  • एमईई म्हणजे मॅनेजमेंट इफेक्टीव्हनेस इव्हएल्यूएशन
  • एमईईच्या निकषांवर देशातील व्याघ्रप्रकल्पांची तपासणी करण्यात आली आहे.
  • २००६ पासून दर चार वर्षांनी असे मूल्यांकन करण्यात येत आहे.

कशाच्या आधारे करण्यात आले मूल्यांकन?

  • वाघांच्या अधिवासची गुणवत्ता
  • वाघांच्या संख्येत झालेली वाढ
  • अनधिकृत आणि अनैतिक तऱ्हेने केली जाणारी शिकार आणि त्यावरील उपाययोजना

कुठे आहे हा सर्वोत्कृष्ट व्याघ्रप्रकल्प?

मॅनेजमेंट इफेक्टीव्हनेस इव्हएल्यूएशनच्या सर्वेक्षणात पेरियर व्याघ्र प्रकल्पाने ९४.३ टक्के प्राप्त केले आहेत. पेरियर व्याघ्र प्रकल्पाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९३४ मध्ये करण्यात आलेली. केरळ राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या प्रकल्पाने ३५० किलोमीटरचा भूभाग व्यापला आहे. वाघांसोबतच इथल्या हत्तींसाठी हा प्रकल्प विशेष प्रसिद्ध आहे.

सध्या भारतातल्या इतर व्याघ्र प्रकल्पांची काय स्थिती आहे?

  • भारतात एकूण ५३ व्याघ्र प्रकल्प आहेत, ज्यात ३००० हून अधिक वाघांचा समावेश होतो.
  • एक्सलंट कॅटेगरीत – १२ व्याघ्र प्रकल्प
  • व्हेरी गुड कॅटेगरीत – २० व्याघ्र प्रकल्प
  • गुड कॅटेगरीत – १४ व्याघ्र प्रकल्प
  • फेयर कॅटेगरीत – ५ व्याघ्र प्रकल्प
  • तर सर्वात शेवटच्या म्हणजे पुअर विभागात कोणत्याही व्याघ्र प्रकल्पाची गणना करण्यात आलेली नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.