बेस्ट (Best) उपक्रमाच्या आवारामधील मोकळा भाग तसेच इमारतीच्या गच्चीवर भागात दूरसंचार मनोरे अर्थात मोबाईल टॉवर बसवण्यात आले असून बेस्ट उपक्रमाने तब्बल ६५ ठिकाणी अशाप्रकारचे मनोरे बसवण्यास परवानगी दिली आहे. या ६५ जागांवर मोबाईल टॉवर बसवण्यास परवानगी दिलेली असतानाच परस्पर १० ठिकाणे बदलून प्रत्यक्षात ५१ जागेवरच कंपनीने टॉवर बसवल्याची माहिती मिळत आहे. या संबंधित कंपनीने केवळ ३ कोटी १७ लाख रुपयेच बेस्टला अदा केले असून उर्वरीत रक्कम बेस्टला दिली किंवा नाही याची माहिती मात्र बेस्टकडूनच प्राप्त होत नाही.
बेस्टच्या (Best) विविध आगार तसेच डेपो आणि त्यांच्या आवारातील गच्ची तसेच मोकळ्या जागेवर दूरसंचारण संधारण मनोरे अर्थात मोबाईल टॉवर उभारण्यासाठी सुयोग टेलीमॅटिक्स कंपनीला परवानगी दिली होती. उपक्रमाच्या आवारांत ६५ ठिकाणी हे मोबाईल टॉवर बसवण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे या कंपनीला एप्रिल २०१७ पासून पुढील एक वर्षांचे ३ कोटी १७ लाख ४० हजार रुपये एवढे भाडे उपक्रमाला अदा केले होते.
(हेही वाचा Shivaji University च्या नामविस्तारासाठी कोल्हापुरात १० हजार हिंदू उतरले रस्त्यावर)
परंतु प्रत्यक्षात ६५ ऐवजी संबंधित कंपनीने केवळ ५१ जागांवरच हे मोबाईल टॉवर उभारले. उर्वरीत १४ जागांवर विविध अडचणींमुळे हे मोबाईल टॉवर उभारता आले नसल्याचे कंपनीने बेस्टला कळवले. मात्र, ज्या ५१ ठिकाणी मोबाईल टॉवर बसवले त्यातील १० ठिकाणच्या जागा बदलण्यात आल्या होत्या. बेस्टच्या (Best) अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रशासकांच्या मंजुरीनेच या १० जागा बदलून देण्यात आल्या. त्यामुळेच ५१ टॉवर उभारण्यास कंपनीला विलंब झाला. या टॉवर उभारण्याच्या कामांमध्ये अनेक अडचणी येत गेल्या. ज्यामुळे मोबाईल टॉवर उभारण्याच्या कामास विलंब झाला आणि ही कारण कंत्राटदाराच्या आवाक्याबाहेरील होती. एवढेच नाही तर १४ जागांवर कंत्राटदार टॉवर उभारु न शकल्याने या १४ जागांचे भाडे परत न करता कंत्राटदाराने उभारलेल्या ५१ जागेच्या वार्षिक भाड्यांमध्ये समायोजन करण्यास मान्यता दिली आहे. (Best)
विशेष एकूण कंत्राटदाराचा कालावधी आता डिसेंबर २०२७ पर्यंत वाढवण्यात आला असून या कंपनीकडून आजवर केवळ ३ कोटी १४ लाख रुपयांच्या तुलनेत पुढील वार्षिक भाडे स्वरुपातील रक्कम बेस्टला (Best) अदा झाली नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र, प्रशासनाकडून याबाबत कोणतीच माहिती उपलब्ध होत नसल्याने यासर्व मोबाईल टॉवरचे तसेच वार्षिक भाड्याचे ऑडीट करणे आवश्यक आहे. त्यामुळे हे ऑडीट केल्यास प्रत्यक्षात मोबाईल टॉवर किती आणि त्यांचे भाडे किती प्राप्त झाले याची खरी माहिती समोर येईल,असे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community