आता ‘लोकल’साठी प्रवाशांचा हल्लाबोल! 

रविवारी, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी सकाळी ७ वाजता ल्वे प्रवासी संघटना रेल्वे मुख्यव्यवस्थापकांच्या कार्यालयावर तोंड़ाला काळा मास्क लावून सोशल डिस्टन्सचे पालन करुन निषेध व्यक्त करणार आहे.

राज्य सरकारने सोमवारी, २ ऑगस्ट रोजी अनलॉक प्रकियेअंतर्गत राज्यातील २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल केले आहेत. तर ११ जिल्ह्यांमधील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या अगदीच कमी झाली आहे, मात्र कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून राज्य सरकारने लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी खुला न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यामुळे आता रेल्वे प्रवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. येत्या १५ ऑगस्ट रोजी रेल्वे प्रवासी थेट मध्य रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकीयांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

१५ ऑगस्ट रोजी होणार हल्लाबोल!

गरीब, कष्टकरी, खासगी नोकरदार वर्गाचा रेल्वे प्रवास बंद आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कर्जत, कसारा, पनवेल व विरारवरून येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. आता त्यांना कुटुबांसह आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. लोकल सेवा सरसकट सर्वांसाठी चालू करावी, यासाठी मंगळवारी, ३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. सध्याची कोविड परिस्थिती, पावसाळी वातावरण व गोरगरिब रेल्वे प्रवाशी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची आर्थिक अडचण, कायदा व सुव्यवसथेचा प्रश्न यांचा विचार करता मंगळवारचा मोर्चा रद्द करून तो रविवारी, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी सकाळी ७ वाजता तोंड़ाला काळा मास्क लावून सोशल डिस्टन्सचे पालन करुन निषेध व्यक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती महराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अभिजीत धुरत यांनी दिली.

(हेही वाचा : कार्यालयांत पोहचायला ‘शिव पंख’ द्या! लोकल प्रवासावरून मनसेचा टोला)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here