वसतिगृहात राहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!

86

सामाजिक न्याय मंत्रालयाच्या समाजकल्याण विभागाची वसतिगृहे सुरू करण्यास अखेर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी हिरवा कंदील दिला आहे. सोमवार २४ जानेवारीपासून, राज्यातील विविध विभागांत असलेली वसतिगृहे सुरू होणार आहेत. या निर्णयामुळे अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध घटकांमधील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

( हेही वाचा : अन्यथा बसमधून खाली उतरा…PMPML महामंडळाचा मोठा निर्णय! )

कोरोनामुळे वसतिगृहे बंद 

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामाजिक न्याय विभागातर्फे चालवण्यात येणारी वसतिगृहे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे विद्यार्थी कुठे जाणार, असा प्रश्न होता. विद्यार्थी वसतिगृहांमधून जात नाहीत, हे पाहून विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनेक वसतिगृहांमधून विद्यार्थ्यांना जबरदस्तीने बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. या विरोधात पुण्यातील तसेच इतर अनेक विभागांमधील वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

( हेही वाचा : …तर मुलींना २१व्या वर्षी मिळणार ५ लाख रूपये! जाणून घ्या ‘या’ योजनेविषयी )

अखेर माघार 

पुण्यातील ‘स्टुडंट हेल्पिंग हँड’ या विद्यार्थी संघटनेने वसतिगृहे बंद ठेवण्याच्या विरोधात उपोषण सुरू केले होते. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनीच आंदोलनाचा बडगा उगारल्याने अखेर समाजकल्याण विभागाला माघार घ्यावी लागली असून, वसतिगृहे सुरूच ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. यामुळे आता सोमवारपासून ही वसतिगृहे सुरू होणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.