बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर होणारा छळ चिंताजनक; अमेरिकेच्या ‘राष्ट्रीय गुप्तचर’च्या संचालिका Tulsi Gabbard यांचे विधान

60

इस्लामी आतंकवाद (Islamic terrorism) जगासाठी चिंतेचे एक प्रमुख कारण आहे. बांगलादेशात हिंदु (hindus in bangladesh), बौद्ध, ख्रिस्ती आणि इतर लोक बर्‍याच काळापासून दुर्दैवी छळ, हत्या यांचा सामना करत आहेत. अमेरिकेसाठीही हा चिंतेचा विषय बनला आहे. राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि त्यांचे प्रशासन या विषयावर सतत चर्चा करत आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या ‘राष्ट्रीय गुप्तचर’च्या संचालिका तुलसी गॅबर्ड (Tulsi Gabbard) यांनी भारतात एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली.

(हेही वाचा – Nagpur Violence : नागपूर घटनेवर प्रवीण दरेकरांचा तीव्र शब्दात निषेध, “दंगल करणाऱ्यांना सोडणार नाही”)

भारतात जगभरातील उच्च गुप्तचर अधिकार्‍यांची परिषद (Council of Senior Intelligence Officials) आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी तुलसी गॅबर्ड भारतात आल्या आहेत. या परिषदेचे अध्यक्षस्थान भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांनी भूषवले. या परिषदेत आतंकवाद आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यांमुळे निर्माण होणार्‍या धोक्यांसह विविध सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली.

दरम्यान, जीनिव्हा येथे असलेल्या या कार्यालयाकडून नवा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. ‘गेल्या वर्षीच्या आंदोलनादरम्यान बांगलादेशचे तत्कालीन सरकार, सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणा, तसेच अवामी लीग पक्षाशी संबंधित हिंसक घटकांनी पद्धतशीरपणे अधिकारांचे उल्लंघन केले. ते मानवतेविरोधातील गुन्हे ठरू शकतात. त्यांच्या तपासाची आवश्यकता आहे,’ असे यामध्ये म्हटले आहे. ‘१ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान झालेल्या आंदोलनात एक हजार ४००हून अधिक जणांची हत्या, तर एक हजार जण जखमी झाले, असा अंदाज आहे. यातील बहुतांश जणांना बांगलादेशच्या सुरक्षा दलांनी ठार केले,’ असे विविध विश्वासार्ह सूत्रांच्या हवाल्याने मानवाधिकार कार्यालयाने म्हटले आहे. (Tulsi Gabbard)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.