-
ऋजुता लुकतुके
निवृत्ती नंतरचं नियोजन हे खूप महत्त्वाचं. पण, ७५ टक्के भारतीय हे निवृत्तीनंतर मुदतठेवींमध्ये जमलेले पैसे आणि आपली मुलं यांच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असल्याचं एका अहवालात समोर आलं आहे. (Personal Finance)
अर्थविषयक नियोजन हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि अलीकडेच बजाज फायनान्स (Bajaj Finance) या संस्थेनं भारतीयांच्या गुंतवणुकीच्या सवयी आणि निवृत्तीसाठीची तरतूद जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं. यात काही धक्कादायक निकाल समोर आले आहेत. (Personal Finance)
अजूनही ७५ टक्के भारतीय हे मुदतठेवींकडेच आयुष्याचा आधार म्हणून पाहत असल्याचं यातून समोर आलं आहे. तर मुदतठेवींबरोबरच आपली मुलं आपल्याकडे बघतील अशी आशा त्यांना आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत भारतात खूप मोठी विषमता दिसून आल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. (Personal Finance)
तरुण वर्ग तुलनेनं जास्त म्युच्युअल फंड (Mutual fund), बाँड मार्केट (bond market) अशा साधनांचा विचार करतो. तसंच छोट्या शहरांच्या तुलनेत महानगरांमध्ये आधुनिक गुंतवणुकीची साधनं जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचल्याचा निष्कर्ष या अहवालात काढला आहे. म्हणजेच गुंतवणुकीतील ही विषमता गुंतवणूकदारांच वय आणि राहण्याचं ठिकाण यात ठळकपणे दिसते आहे. (Personal Finance)
५ पैकी ४ कुटुंबं सुरक्षित गुंतवणूक म्हणून अजूनही मुदतठेवींकडेच पाहत असल्याचं या अहवालातून दिसतंय. (Personal Finance)
‘कोरोना उद्रेकानंतर जवळ जवळ सगळ्यांनाच आर्थिक भविष्याची तरतूद करण्याचं महत्त्व पटलं आहे. त्यामुळे निवृत्ती नंतरच्या आर्थिक नियोजनाकडे लोकांचा कल वाढत आहे. अशावेळी लोकांना अशा गुंतवणुकीविषयी नेमकं काय वाटतं आणि त्यांचे प्रयत्न योग्य दिशेनं होत आहेत का,’ यासाठी हे सर्वेक्षण केल्याचं बजाज कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज (Rajiv Bajaj) यांनी सांगितलं. (Personal Finance)
ऑनलाईन झालेल्या या सर्वेक्षणात ५,५०० लोकांनी भाग घेतला आणि यातील ७५ टक्के लोक हे महानगरातील होते. (Personal Finance)
(हेही वाचा – Champions Trophy Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला खेळायला लावा, नाहीतर आम्हाला नुकसान भरपाई द्या, पीसीबीचं आयसीसीला साकडं)
अहवालातून समोर आलेले काही ठळक निष्कर्ष
- ५,५०० लोकांपैकी ३२ टक्के तरुणांनी आपलं निवृत्ती नंतरचं आर्थिक नियोजन सुरू केलं आहे.
- कोव्हिड उद्रेकाने लोकांना निवृत्ती नंतरच्या नियोजनाची गरज पटवून दिली आहे. २०२२ नंतर ३८ टक्के लोकांनी अशा नियोजनाची सुरुवात केली.
- तरुणांचा कल म्युच्युअल फंडातील (Mutual fund) गुंतवणुकीकडे आहे. पण, छोटी शहरं आणि ६० वर्ष वयानंतरचे लोक यांचा अजूनही ओढा मुदतठेवींकडेच आहे. ४५ टक्के लोक फक्त मुदतठेवींत गुंतवणूक करतात. तर ४४ टक्के लोक विम्यामध्येही गुंतवणूक करतात.
- निवृत्ती नंतरही आर्थिक स्वातंत्य कायम राहावं आणि महागाई दराला मागे टाकेल असा परतावा देणारी गुंतवणूक करण्याकडे तरुणांचा कल.
- महानगरातील तरुण छोट्या शहरातील तरुणांच्या तुलनेत खूप आधी गुंतवणूक सुरू करतात.
- येत्या ५ वर्षांत निवृत्तीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या २५ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज.
- वाढत्या महागाईचं भान आणि वाढलेलं उत्पन्न यामुळे गुंतवणुकीचा वाढता कल.
- सरकारच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आणि अटल विमा योजनेलाही लोकांचा प्रतिसाद. (Personal Finance)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community