- ऋजुता लुकतुके
२०२५ साल सुरू झालं आहे. आणि नवीन वर्षी आर्थिक नियोजन करताना रिझर्व्ह बँकेचे काही बदललेले नियम महत्त्वाचे ठरणार आहेत. तुम्हाला क्रेडिट कार्डावर मिळणारी सवलत, मुदतठेवीतून पैसे काढण्याचे नियम, युपीआयचा वापर तसंच ईपीएफओ नियमही काही प्रमाणात बदलले आहेत. हे सगळे बदल १ जानेवारीपासून लागू झाले आहेत.
१. मुदतठेवींचे बदललेले नियम – रिझर्व्ह बँकेनं बँकेतर वित्तीय संस्थेच्या तसंच गृहकर्ज देणाऱ्या बँकांमधील मुदतठेवींवरील नियम बदलले आहेत. बँकेतर वित्तीय संस्थेत केलेल्या मुदतठेवीतील रुपये १००० पर्यंतची रक्कम तुम्ही मुदतीपूर्वीच काढून घेऊ शकाल. तर कुठलीही मुदतठेव वैद्यकीय कारणांवरून आता मुदतीआधी मोडता येईल. (Personal Finance Updates)
(हेही वाचा – Property Tax : मुंबई महापालिकेकडून ६८ टक्के मालमत्ता कराची वसुली)
२. रुपे क्रेडिट कार्डांना मिळणारी विमानतळ लाऊंजची सवलत – नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने रुपे क्रेडिट कार्डावर मिळणाऱ्या विमानतळ लाऊंज सवलतीचे नियम बदलले आहेत. विमानतळावर मिळणाऱ्या सुविधा आता विविध स्तरांमध्ये उपलब्ध होतील. म्हणजेच क्रेडिट कार्डाच्या रकमेवरून या सवलती ठरतील.
३. सेन्सेक्स, बँकेक्स महिन्याची एक्सपायरी – निर्देशांकाचे डेरिव्हेटिव्ह व्यवहार हे आता महिन्याच्या महिन्याला संपतील. बाँबे स्टॉक एक्सचेंजने २८ नोव्हेंबरला दिलेल्या निर्देशानुसार, बीएसईमधील वायदे सौदे आठवड्याचे असतील तर शुक्रवार ऐवजी आता मंगळवारला संपतील. तर महिन्याचे सौदे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी संपतील. (Personal Finance Updates)
(हेही वाचा – EPS Rule Tweak: आता देशभरात कुठल्याही बँक खात्यांमध्ये मिळणार पेन्शनची रक्कम)
४. ईपीएफओ – ईपीएफओ खात्यांमध्ये तांत्रिक सुधारणा होणार आहेत. १ जानेवारीपासून नवीन सेवा सुरू करण्याचा अर्थमंत्रालयाचा विचार आहे. यामध्ये ईपीएफओ खात्यातील पैसे बँकेच्या कुठल्याही खात्यातून मिळू शकणार आहेत. ७८ लाख ईपीएफओ खातेदारांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल. इतकंच नाही तर निवृत्तीवेतनाचे पैसे एटीएम केंद्रांमधून उपलब्ध करून देण्यावरही ईपीएफओ कार्यालय विचार करत आहे. तसंच पैसे काढून घेण्याची मर्यादाही हटवण्यात येणार असल्याचं समजतंय.
५. युपीआय व्यवहार – इथून पुढे युपीआय वापरून तुम्ही पेमेंट वॉलेट्समध्येही पैसे साठवू शकणार आहात. यामुळे युपीआयची व्याप्ती आणखी वाढेल. थर्ड पार्टी व्यवहारांमध्येही युपीआयचा सर्रास वापर होऊ शकेल. युपीआय वापरण्याचा अनुभवच त्यामुळे बदलू शकतो. पीपीआय वॉलेटधारकांना थर्ड पार्टी ॲप वापरून युपीआय द्वारे पैसे देता येतील. (Personal Finance Updates)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community