तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यात एक गाभण गाय चोरीला गेली. त्या गायला गावाबाहेर नेऊन ठार करण्यात आले. गाय चोरीला गेल्याचे समजताच गावकऱ्यांनी गायीचा शोध सुरू केला. त्यांना गायीची कातडी आणि हाडे सापडली. यानंतर गावकरी संतापले. गायीची हत्या (Cow Slaughtering) केल्यानंतर मारेकर्यांनी तिचे मांस विकून हाडे व कातडे तेथेच टाकून दिले.
भाजपच्या कार्यकर्त्यांची निदर्शने
तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील शंकरपट्टनम मंडळातील मोलांगूर गावात ही घटना घडली. येथे गजुला कुमार नावाच्या गावकऱ्याची गाय सद्दाम, शेख ताज या धर्मांध मुसलमानांनी (Muslim) 31 डिसेंबर 2023 च्या मध्यरात्रीच्या सुमारास गाय चोरली. गावकऱ्यांनी सांगितले की, गावाबाहेर गायीचे अवशेष, तिची कातडी आणि हाडे सापडले. या माहितीनंतर ग्रामस्थ संतप्त झाले. या घटनेनंतर लोकांनी विरोध सुरू केला. करीमनगर आणि वारंगल दरम्यान महामार्गावर भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. याप्रकरणी भाजप खासदार संजय कुमार यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी गोहत्येशी (Cow Slaughtering) संबंधित व्हिज्युअल शेअर केले. या व्हिडिओमध्ये गावकरी गायीच्या पायाच्या हाडांना हात लावून रडत असल्याचे दिसत आहे.
It makes my Blood boil on how a Pregnant Gomatha in Molangur village of Shakarpatnam mandal in Manakoduru is chopped to death. This is horrific and heartbreaking. @TelanganaCMO and @TelanganaDGP, @KarimnagarCp, we demand extremely strict action against the culprits and ensure… pic.twitter.com/WzXyPZrSkk
— Bandi Sanjay Kumar (@bandisanjay_bjp) January 3, 2024
(हेही वाचा Shri Ram : श्रीरामाचा अवमान केल्याप्रकरणी रोहित पवारांचा जितेंद्र आव्हाडांना घरचा अहेर; खडसे, देशमुखांनीही सुनावले )
दोषींवर कारवाई करण्याची मागणी
खासदार संजय कुमार यांनी हे भयानक आणि हृदयद्रावक आहे. आम्ही तेलंगणाचे सीएमओ, तेलंगणा डीजीपी आणि करीमनगर सीपी यांच्याकडे मागणी करतो की, दोषींवर अशी कठोर कारवाई करावी, ज्यामुळे पुन्हा कुणी असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. तेलंगणा गोहत्या प्रतिबंध आणि प्राणी संरक्षण कायदा 1977 अंतर्गत या प्रकरणी तीन लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक दुचाकी, गायीचे चामडे आणि गायीच्या हत्येसाठी (Cow Slaughtering) वापरलेली हत्यारेही जप्त केली आहेत.
Join Our WhatsApp Community