दारूच्या बाटल्यांवर कर्करोगाचा इशारा लिहिण्याची मागणी करणारी याचिका Bombay High Court मध्ये दाखल

51

केंद्र सरकार आणि राज्य सरकार तसेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) यांना दारूच्या बाटल्यांवर कर्करोगाचा इशारा देणारे लेबल लावण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाखल करण्यात आली आहे.

(हेही वाचा Triple Talaq प्रथा सुरू आहे का? सर्वोच्च न्यायालयाने पडताळणी करण्यासाठी मागितली आकडेवारी)

सामाजिक कार्यकर्ते यश चिलवार यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, जागतिक आरोग्य संघटनेने अल्कोहोलला वर्ग १ कर्करोगजन्य (कर्करोगास कारणीभूत ठरू शकणारा पदार्थ) म्हणून घोषित केले आहे, परंतु ही वस्तुस्थिती जनतेसमोर उघड केलेली नाही. याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, दारू पिणे कर्करोगाला आमंत्रण देते आणि दारूच्या बाटल्यांच्या लेबलिंगवर हे स्पष्टपणे नमूद केले पाहिजे, परंतु असे केले जात नाही. जेव्हा एखादा ग्राहक एखादे उत्पादन खरेदी करतो तेव्हा त्यात असलेल्या घटकांची आणि माहितीची पूर्ण जाणीव असणे हा त्याचा अधिकार आहे, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. आयर्लंड आणि दक्षिण कोरियासारख्या विकसित देशांनी आधीच अल्कोहोल सेवन आणि कर्करोगाचा संबंध जोडणारे इशारे अनिवार्य केले आहेत, असे वृत्त आहे. (Bombay High Court)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.