गेली दोन वर्षे कोरोना विषाणूमुळे देशभरात अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) मुख्य परीक्षा देता आली नव्हती. कोरोनामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना युपीएससीच्या मुख्य परीक्षेची अतिरिक्त संधी मिळावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज, सोमवारी यासंदर्भात याचिका दाखल करुन घेतली असून न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. सी. टी. रविकुमार यांनी याप्रकरणावर 7 मार्ज रोजी सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले.
( हेही वाचा : भारतातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी का जातात युक्रेनमध्ये? जाणून घ्या कारण )
याचिका कर्त्याच्यावतीने वरिष्ठ विधीज्ञ गोपाल संकरनारायणन यांनी यासंबंधीची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. यावेळी त्यांनी हे स्पष्ट केले की, यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने पूर्व परीक्षेसंदर्भातील याचिकेवर सुनावणीस नकार दिला होता. पण ही याचिका मुख्य परीक्षेसंदर्भात आहे.
याचिका दाखल
जे विद्यार्थी मुख्य परीक्षेदरम्यान कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यांना परीक्षा देता आली नाही पण ही माहिती समोर न आणता ते परीक्षेसाठी खोटेही बोलू शकले असते पण या विद्यार्थ्यांनी तसेही केले नाही. असे या याचिकेत नमूद केले आहे. याचिकाकर्त्यांचा हा युक्तीवाद मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी याचिका दाखल करुन घेण्यास परवानगी दिली तसेच या याचिकेची प्रत न्यायालयात जमा करण्याचे आदेशही दिले आणि या याचिकेवर 7 मार्च रोजी सुनावणी होईल असे सांगितले.
Join Our WhatsApp Community