राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त, शुक्रवारपासून प्रमुख शहरांत असे असतील नवे दर

168

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील जनतेला मोठे गिफ्ट दिले आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊन जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. गुरुवारी रात्री 12 पासून हा निर्णय संपूर्ण राज्यात लागू होणार आहे. त्यामुळे शुक्रवारपासून राज्यातील विविध भागांत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार आहेत. राज्यातील प्रमुख शहरांत कसे असतील नवीन दर?

असे असतील नवीन दर

  • मुंबई

पेट्रोलः जुने दर- 111.35 रु./लिटर, नवे दर- 106.35 रु./लिटर

डिझेलः जुने दर- 97.28 रु./लिटर, नवे दर- 94.28 रु./लिटर

  • पुणे

पेट्रोलः जुने दर- 110.88 रु./लिटर, नवे दर- 105.88 रु./लिटर

डिझेलः जुने दर- 95.37 रु./लिटर, नवे दर- 92.37 रु./लिटर

  • ठाणे

पेट्रोलः जुने दर- 111.49 रु./लिटर, नवे दर- 106.49 रु./लिटर

डिझेलः जुने दर- 97.42 रु./लिटर, नवे दर- 94.42 रु./लिटर

petrol diesel price 23

  • नागपूर

पेट्रोलः जुने दर- 97.04 रु./लिटर, नवे दर- 92.04 रु./लिटर

डिझेलः जुने दर- 89.89 रु./लिटर, नवे दर- 86.89 रु./लिटर

  • नाशिक

पेट्रोलः जुने दर- 111.74 रु./लिटर, नवे दर- 106.74 रु./लिटर

डिझेलः जुने दर- 96.20 रु./लिटर, नवे दर- 93.20 रु./लिटर

  • औरंगाबाद

पेट्रोलः जुने दर- 112.97 रु./लिटर, नवे दर- 107.97 रु./लिटर

डिझेलः जुने दर- 98.89 रु./लिटर, नवे दर- 95.89 रु./लिटर

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.