आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहे. कच्च्या तेलातील किरकोळ किमतीच्या घसरणीसह प्रति बॅरल 93 डॉलरवर पोहोचले आहे. मात्र दिवाळीच्या मुहूर्तावरही सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झालेली असली तरी देखील ऐन दिवाळीत पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. देशातील सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांनी काही प्रकारची दरवाढ केली असून त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.
(हेही वाचा – महावितरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेविना केली जाणार निवड, असा करा अर्ज)
इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, सोमवारी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये होते. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. त्याचप्रमाणे चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड 0.46 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 93.04 डॉलर इतके आहे. त्याचप्रमाणे यूएस वेस्ट टेक्सस इंटरमीडिएट (WTI) क्रूड देखील 0.53 टक्क्यांनी वाढून 0.45 डॉलर प्रति बॅरल 84.60 इतके आहे.
Join Our WhatsApp Community