22 मार्चपासून सुरु असलेली इंधन दरवाढ थांबायच नावच घेत नाहीये. मंगळवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत ही 13 वी वाढ आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची पाठ ही महागाई काही सोडत नसल्याचेच दिसून येत आहे.
84 पैशांनी वाढले पेट्रोल
इंधनाच्या दरवाढीचा परिणार इतर गोष्टींवरही दिसून येत आहे. मुंबई शहरात आज पेट्रोलचा दर 84 पैशांनी वाढला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 119.67 रुपये प्रति लीटर तर डिझेल 85 पैशांनी वाढून 103.92 रुपये प्रति लीटर झाले आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल परभणीत विकले जात आहे. आजच्या दरवाढीनंतर परभणीत एक लिटर पेट्रोल 122.01 रुपये आहे. तर, डिझेल 104.62 रुपये इतके आहे. या वाढीमुळे राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 104.61 रुपये, तर डिझेलची किंमत 95.87 रुपये प्रति लीटर झाली आहे.
( हेही वाचा: जाणून घ्या, भारतात इलेक्ट्रिक गाड्या पेट का घेताहेत? )
देशातील प्रमुख शहरांचे दर
शहर पेट्रोल डीझेल
दिल्ली -104.61 95.87
कोलकाता – 114.28 99.02
मुंबई -119.67 103.92
चेन्नई -110.09 100.18
सीएनजीचे दर वाढले
यापूर्वी सीएनजीचे दरही किलोमागे 80 पैशांनी वाढले होते. या दरवाढीनंतर दिल्लीत सीएनजीची नवीन किंमत 61.61 रुपये प्रति किलो झाली आहे. सीएनजीच्या दरातही आठवडाभरात तीन वेळा वाढ करण्यात आली आहे. आठवडाभरात ते 2.40 रुपये किलोने महागले आहे.